30.4 C
Latur
Monday, February 6, 2023
Homeक्रीडामीडिया आमच्या नात्याला चुकीच्या पध्दतीने दाखवतेय

मीडिया आमच्या नात्याला चुकीच्या पध्दतीने दाखवतेय

एकमत ऑनलाईन

कराची : मीडियाने आमच्यातील नाते चुकीच्या पद्धतीने दाखवले आहे. त्यामुळे नेटक-यांना आम्हाला दोष देण्याची आयतीच संधी मिळाली, असे विधान पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल आयशा उमर हिने तिच्या आणि शोएबच्या अफेअरवर केले आहे.

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने पाकिस्तानचा फलंदाज शोएब मलिकशी लग्न केले आणि ती वादात अडकत गेली. आता तर सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाची चर्चा सुरू झाली आहे. या सगळ्यात ज्या व्यक्तीवरून सानिया-शोएबच्या संसाराला घरघर लागली त्या अभिनेत्रीने मोठा खुलासा आता केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही सेलिब्रेटींच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

पाकिस्तानमध्ये आयशाचा चाहतावर्ग मोठा आहे. तिला इन्स्टावर फॉलो करणा-यांची संख्याही मोठी आहे. एका मुलाखतीमध्ये आयशा म्हणाली की, एका लग्न झालेल्या व्यक्तीसोबत मी कशाला रिलेशन सुरू ठेवेल. आणि शोएब-सानियाविषयी मला माहिती आहे. त्यांच्यात मला कोणत्याही प्रकारे दुरावा तयार करायचा नाही. मात्र लोकांना हे कळत नाही.

आमचं जर खरंच अफेअर सुरू असतं तर आम्ही ते सोशल मीडियावर कशाला व्हायरल केले असते, लग्न झालेल्या व्यक्तीसोबत तुम्ही जेव्हा फोटोशूट करता तेव्हा त्या व्यक्तीला नेहमीच ट्रोल केले जाते हा आतापर्यंतच्या वेगवेगळ्या सेलिब्रेटींवरून आपल्याला दिसून येईल. मलाही माझे आयुष्य आहे. मी ते वेगळ्या पद्धतीने प्लॅन करण्याचा विचार करते आहे. तेव्हा कोण काय बोलते याबाबत जास्त विचार करत नसल्याचे आयशाने म्हटले आहे.

या प्रकरणात खरे काय आणि खोटे काय हे कळेनासे झाले आहे. एकीकडे सानिया आता आपली काळजी अल्ला घेणार आहे असे सांगून चाहत्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडते आहे तर दुसरीकडे शोएबने आमच्या संसारात बाकीच्यांनी विनाकारण लुडबूड करण्याची काही गरज नाही असे सांगून त्या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या