23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeक्रीडामुंबई इंडियन्सचा खेळाडू ऑस्ट्रेलियाकडून खेळणार

मुंबई इंडियन्सचा खेळाडू ऑस्ट्रेलियाकडून खेळणार

एकमत ऑनलाईन

मुंबई: आयपीएल २०२२ स्पर्धा आता संपली आहे. या स्पर्धेत जगभरातील दिग्गज क्रिकेटपटू सहभागी झाले होते. या स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीकडे फक्त भारतीय निवड समितीचे नाही तर क्रिकेट विश्वातील अन्य निवड समितीचेही लक्ष होते.यावर्षी टी२० वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियात होणार आहे. ऑस्ट्रेलियाने मागील वर्षी हा वर्ल्ड कप जिंकला होता. त्यामुळे यंदा त्यांना वर्ल्ड कप राखण्याचे आव्हान आहे. मुंबई इंडियन्सकडून आयपीएल स्पर्धा गाजवलेला टीम डेव्हिड आमच्या योजनेचा भाग आहे, असं ऑस्ट्रेलियाचा वन-डे आणि टी२० टीमचा कॅप्टन आरोन फिंच याने सांगितले आहे.

डेव्हिडनं यापूर्वी सिंगापूरकडून १४ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. पण, त्यानं ऑस्ट्रेलियात आजवर एकही प्रथमश्रेणी सामना खेळलेला नाही. पुढील महिन्यात श्रीलंकेविरूद्ध होणा-या टी२० मालिकेसाठी डेव्हिडचा ऑस्ट्रेलियन टीममध्ये समावेश करण्यात आलेला नाही, पण त्याला लवकरच संधी मिळेल, असं फिंचने सांगितलं आहे. तो गेल्या काही काळापासून जबरदस्त फॉर्मात आहे.

आयपीएलमधील शेवटच्या सामन्यात त्यानं दमदार कामगिरी केली. पहिल्या बॉलपासून आक्रमक खेळण्याचं त्याच्याकडं दुर्मिळ कौशल्य आहे. ते त्यानं अनेकदा सिद्ध केले आहे. तो सातत्यपूर्ण खेळ करत आहे. आम्ही त्याचा आगामी काळात निश्चित विचार करू,असे फिंचने सांगितले. डेव्हिडची दमदार कामगिरी मुंबई इंडियन्सनं टीम डेव्हिडला आयपीएल लिलावात ८ कोटी २५ लाखांना खरेदी केले होते. मुंबईनं डेव्हिडला सुरूवातीच्या काही सामन्यानंतर वगळले.

त्यानंतर शेवटच्या टप्प्यात त्याचा समावेश करण्यात आला. आयपीएल २०२२ मध्ये मुंबईची कामगिरी निराशाजनक झाली असली तरी डेव्हिडने प्रभावी कामगिरी केली. त्यानं ८ सामन्यात ३७.२० च्या सरासरीनं १८६ रन केले. आयपीएलमध्ये त्याचा स्ट्राईक रेट तब्बल २१६.२७ इतका होता. मुंबई इंडियन्सचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आल्यानंतर डेव्हिड सध्या इंग्लंडमध्ये टी२० क्रिकेट खेळत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या