24.8 C
Latur
Monday, September 27, 2021
Homeक्रीडाटोकियोत ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा थाटात

टोकियोत ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा थाटात

एकमत ऑनलाईन

टोकियो : जपानची राजधानी टोकियो येथे शुक्रवारपासून ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली आहे. कोरोना व्हायरस साथीच्या आजारामुळे ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्षासाठी तहकूब करण्यात आल्या. पण एका वर्षानंतर या स्पर्धा खेळवल्या जात आहेत. आज या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा अतिशय दिमाखात रंगला. टोकियो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्याच्या मार्चपास्टमध्ये भारतीय तुकडी २१ व्या क्रमांकावर उतरली. यात २२ खेळाडू आणि ६ अधिकारी सहभागी झाले. या मार्चपास्टमध्ये ग्रीकचा पहिला क्रमांक होता.

सहा वेळा विश्वविजेती बॉक्सर एम. सी. मेरी कोम आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांनी उद्घाटन सोहळ्यात भारतीय पथकाचे नेतृत्व केले. भारतीय पथकाच्या प्रवेशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाळ््या वाजवून संघाला प्रोत्साहन दिले. १२७ खेळाडूंसह २२८ सदस्यीय पथक टोकियो ऑलिम्पिकमध्ये पाठवण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू या स्पर्धेत चांगले प्रदर्शन करतील आणि मोठ्या संख्येने मेडल मिळवतील, असा भारतीयांना विश्वास आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रथमच इस्वॅटिनी देशातील खेळाडूंनी ऑलिम्पिक सोहळ्यात भाग घेतला. वास्तविक हा नवीन देश नाही. दक्षिण आफ्रिका स्थित स्वाझीलँड देशाचे हे नवीन नाव आहे. हे नवीन नाव २०१८ मध्ये स्वीकारले गेले.

कोरोनामुळे मोठे बदल
कोरोनामुळे ऑलिम्पिकमध्ये बरेच मोठे बदल पाहायला मिळतील. खेळाडूंना या विषाणूच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी एक अतिशय कठोर बायो बबल तयार केला गेला आहे. कोरोना महामारीमुळे खेळाडूंना दररोज १९ चाचणींमधून जावे लागेल. या चाचणीच्या अहवालाशिवाय कोणत्याही खेळाडूला मैदानावर प्रवेश मिळणार नाही. इतकेच नव्हे, तर एखाद्या खेळाडूने अंतिम फेरी गाठली असेल आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असेल तर त्याला पदकाच्या शर्यतीतून माघार घ्यावी लागेल.

प्रेक्षकांशिवाय रंगणार स्पर्धा
टोकियो ऑलिम्पिक प्रेक्षकांशिवाय रंगणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे आणि यातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती लक्षात घेऊन या स्पर्धेत प्रेक्षकांना परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे ऑलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच यंदा प्रेक्षकांशिवाय स्पर्धा रंगणार आहेत.

भाविकांच्या मिनीबसला आयसरची धडक; ४ ठार, ३ गंभीर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या