20.4 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home क्रीडा श्रीरामपूरपासून यशापर्यंत पोहोचलेला व्यक्ती: लक्ष्मण

श्रीरामपूरपासून यशापर्यंत पोहोचलेला व्यक्ती: लक्ष्मण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली – श्रीरामपूरपासून यशापर्यंत पोहोचलेल्या झहीर खानने आपल्या चारित्र्याची ताकद दाखवून दिली आहे, असे मत माजी भारतीय फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने दिले. लक्ष्मण पुढे म्हणाला,झहीरकडे मोठी स्पप्ने पाहण्याची हिंमत होती आणि या स्वप्नांचा पाठलाग करण्याचा त्याने निर्धार केला होता.लक्ष्मण सध्या ट्विटरवर दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंचे फोटो पोस्ट करत असून तो आपली प्रतिक्रिया देत आहे.

काउंटी क्रिकेटमध्ये वॉस्टरशायरकडून खेळताना त्याने मिळवलेले यश ही त्याच्या कारकिर्दीची नवी सुरूवात होती, असेही लक्ष्मण म्हणाला. झहीरने आॅक्टोबर २०००मध्ये केनियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २००३ वर्ल्ड कपमध्ये तो आशिष नेहरा आणि जवागल श्रीनाथ यांच्यासह भारताच्या गोलंदाजीच्या ताफ्याचा भाग झाला. मात्र त्यानंतर खराब फॉर्म आणि दुखापतीमुळे तो संघातून बाहेर पडला.

Read More  मृतदेहाची अदला-बदली : वडिलांवर लेकानं दोनवेळा केले अंत्यसंस्कार

२००४ मध्ये झहीरने संघात स्थान मिळवले. मात्र, आरपी सिंग, इरफान पठाण, मुनाफ पटेल आणि श्रीशांत संघात दाखल झाले आणि झहीर पुन्हा संघातून बाहेर पडला. त्यानंतर झहीरने काउंटी क्रिकेटमध्ये वॉस्टरशायरकडून खेळण्यास सुरवात केली. काउंटीकडून पदार्पण करत त्याने १० बळी घेतले. यशस्वी काउंटी क्रिकेटनंतर २००६मध्ये पुन्हा तो भारतीय संघाचा भाग झाला.

२०११ च्या विश्वकरंडक स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीने झहीरच्या अनुभवाचा चांगला फायदा उठवला. या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेर्णा­या गोलंदाजांच्या यादीत झहीर पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीबरोबर संयुक्तपणे प्रथम क्रमांकावर होता.
झहीरने भारताकडून २०० एकदिवसीय सामने खेळले असून २८२ विकेट्स घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त त्याने ९२ कसोटी आणि १७ टी-२० सामने खेळले असून त्यात अनुक्रमे ३११ आणि १७ बळी घेतले आहेत. झहीरने २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या