24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeक्रीडाभारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता ?

भारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता ?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आशिया चषकातील दुस-या रोमहर्षक सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानचा संघ १४७ धावांवर ढेपाळला. प्रत्युत्तरात भारतानं पाच विकेट्स राखून पाकिस्तानने दिलेले लक्ष पूर्ण केले.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात पार पडलेल्या सामना क्रिकेट चाहत्यांसाठी पूर्णपणे मनोरंजक ठरला. आता लवकरच हे दोन्ही संघ पुन्हा एकदा आमने सामने येण्याची शक्यता आहे.

आशिया चषकात दोन गटात सहा संघाचं विभाजन करण्यात आलंय. भारत ‘अ’ गटात असून त्यांच्या गटात पाकिस्तान आणि हॉंगकाँचा समावेश आहे. तर, ‘ब’ गटात अफगाणिस्तान, श्रीलंका आणि बांग्लादेशचा समावेश आहे. भारतानं पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना जिंकला आहे. तर, दुस-या सामन्यात हाँगकाँगशी भिडणार आहे. एका गटातून दोन संघ पुढच्या फेरीत प्रवेश करतील. पाकिस्तानसाठी हाँगकाँगला हरवणं मोठी गोष्ट नाही. म्हणजेच ‘अ’ गटात भारत पहिल्या आणि पाकिस्तान दुस-या क्रमांकावर राहून पुढील फेरीत प्रवेश करेल.

सुपर ४ फेरीत आमने-सामने?
गट-अ आणि गट-ब मधील अव्वल दोन संघ सुपर- ४  टप्प्यात पोहोचतील. हे सामने ३ सप्टेंबरपासून सुरू होतील. ३ सप्टेंबरला ब गटातील टॉप-२ संघ आमनेसामने येतील. यानंतर, ४ सप्टेंबर म्हणजेच रविवारी गट-अ मधील टॉप-२ संघ ऐकमेकांशी भिडतील. समीकरणे बरोबर राहिल्यास ४ सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तानमध्ये आणखी एक रंजक सामना पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.

अंतिम सामना सामना कधी?
आशिया चषक २०२२ च्या सहा संघांमध्ये भारत आणि पाकिस्तानची नावे बलाढ्य संघांमध्ये समाविष्ट आहेत. म्हणजेच सुपर-४ सामन्यांमध्ये भारत आणि पाकिस्तान आपापले सामने जिंकून अंतिम फेरीत पोहोचू शकतात. असं झालं तर ११ सप्टेंबरला होणा-या अंतिम फेरीतही भारत-पाकिस्तान यांच्यात तिस-यांदा सामना रंगण्याची शक्यता आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या