19.8 C
Latur
Monday, December 5, 2022
Homeक्रीडाराज्य क्रिकेट असोसिएशनही जखमींना मदत करेल

राज्य क्रिकेट असोसिएशनही जखमींना मदत करेल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सिकंदराबाद येथील जिमखाना मैदानावर तिकिट विक्रीदरम्यान चेंगराचेंगरी झाली. यादरम्यान अनेक क्रिकेट चाहते जखमी झाले. आता या घटनेवर भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन म्हणाला की, हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने काहीही चुकीचे केलेले नाही. या घटनेबद्दल त्यांनी शोकही व्यक्त केला. राज्य क्रिकेट असोसिएशनही जखमींना मदत करेल, असेही अझरूद्दीनने सांगितले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना हैदराबादमध्ये खेळला जाणार आहे. रविवारी २५ सप्टेंबर रोजी हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सामना होण्याआधी तिकिट विक्रीमध्ये काळाबाजार झाला, अशा बातम्या आल्या होत्या.

त्यानंतर तिकिट विक्रीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले. आता हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन यांनी आपली बाजू मांडली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या