22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeक्रीडाप्रथम फलंदाजी करणारे संघ विजयी

प्रथम फलंदाजी करणारे संघ विजयी

एकमत ऑनलाईन

रविवारी झालेल्या दोन्ही सामन्यात प्रथम फलंदाजी करणा-या संघानु टारगेट चेस करणा-या संघाचा पराभव केला. दिल्लीने कोलकाता वर दणदणीत ४४ धावांनी तर राजस्थानने नवोदित लखनौ वर अटीतटीच्या सामन्यात तीन धावांनी विजय मिळवला. रविवारी झालेल्या दोन्ही सामन्यात टारगेट सेट केलेले असताना प्रतिस्पर्धी संघाला आव्हान पेलवले नाही. लखनऊ संघाने शेवटच्या क्षणी कच खाल्ली विसाव्या षटकात १५ धावांची गरज असताना कुलदीप सेनने अकरा धावा दिल्या . खरेतर मार्क स्टाँयनीशने सतरा चेंडूत ३८ धावा करत टारगेट जवळ आणले होते पण त्याला लखनौला विजय मिळवून देता आला नाही.

रविवारी दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील ब्रेबाँर्न वर झालेल्या सामन्यात दिल्लीने कोलकत्याला ४४ धावांनी हरवले. नाणेफेक जिंकूनही कोलकाता कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र दिल्लीच्या फलंदाजांनी त्याचा हा निर्णय चुकीचा ठरवला. दिल्लीकडून सलामी जोडी पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नर यांनी धुव्वादार अर्धशतके ठोकली. त्यांच्यामध्ये पहिल्या विकेटसाठी ९३ धावांची शानदार भागीदारी झाली. या सलामी जोडीनंतर कर्णधार रिषभ पंतने आक्रमक खेळी करत २७ धावांचे योगदान दिले. त्यानंतर अष्टपैलू अक्षर पटेल याने शेवटी धुव्वादार फटकेबाजी करत संघाची धावसंख्या २१५ पर्यंत नेण्यात मोलाची भूमिका बजावली. या सामन्यादरम्यान त्याने अष्टपैलूंचा मोठा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. शेवटी अष्टपैलू अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर यांनी धडाकेबाज खेळी करत संघाला धावांचा मोठा पल्ला पार करून दिला. अक्षरने १४ चेंडूत२ चौकार आणि एका षटकारा सह नाबाद २२ धावा केल्या.

या छोटेखानी पण धुव्वादार खेळीसह आयपीएलमधील आपल्या १००० धावा पूर्ण केल्य. त्याच्या नावावर आयपीएलमध्ये ११३ सामने खेळताना १०२१ धावांची नोंद झाली तर त्याच्या नावावर आयपीएलमध्ये ९० विकेट्सही झाल्याआहेत. आयपीएलमध्ये हा विक्रम करणारा शेन वॉटसन दिल्ली कॅपिटलचा प्रशिक्षक म्हणून सहभागी झाला आहे. त्याने आयपीएलमध्ये १४५ सामन्यांत ३८७४ धावा आणि ९२ विकेट्स घेतल्या. तर चेन्नईचा कर्णधार रविंद्र जडेजाच्या खात्यात २०४ सामन्यांत २४५२ धावा आणि १२८ विकेट्स आहेत. तर चेन्नईचेच प्रतिनिधित्त्व करत असलेल्या ड्वेन ब्रावोच्या नावावर १५५ सामन्यांत १५४६ धावा आणि १७३ विकेट्स आहेत. दिल्लीच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला तो कुलदीप यादवने. त्याने ४ षटकात ३५ धावा देत ४ बळी घेतले २०२१ च्या हंगामात कुलदीप केकेआरसोबत होता, पण त्याला दुखापतीमुळे त्याला एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. आयपीएल २०२०च्या संपूर्ण हंगामात तो फक्त एक विकेट घेऊ शकला होता. आयपीएल २०१९च्या हंगामात कुलदीपच्या नावावर अवघ्या ४ बळी होते. परंतु आता आयपीएल २०२२ मध्ये तो पुनरागमन करताना दिसत आहे. त्याने हंगामातील सुरुवातीच्या चार सामन्यात वैयक्तिक १० विकेट्स पूर्ण केल्या आहेत.

रविवारी वानखेडे स्टेडिअमवर स्पर्धेतील वीसावा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात झाला हा सामना राजस्थान रॉयल्सने ३ धावांनी जिंकला राजस्थानच्या विजयाचे शिल्पकार ठरले कुलदीप सेन आणि युझवेंद्र चहल. या सामन्यात लखनौने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत राजस्थानला फलंदाजीसाठी पाचारण केले. राजस्थानने फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १६५ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानकडून शिमरॉन हेटमायरने ३६ चेंडूत १ चौकार आणि ६ षटकारासह नाबाद ५९ धावा केल्या.त्याच्याशिवाय देवदत्त पडिक्कल( २९ )आर अश्विन( २८), तर कर्णधार संजू सॅमसन आणि जॉस बटलरने प्रत्येकी १३ धावा केल्या.

लखनौला १६६ धावांचे आव्हान पेलवले नाही ते २० षटकात फक्त ८ बाद १६२ धावाच जमवू शकले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी लखनौ कर्णधार के.एल. राहुल आणि क्विंटन डी कॉक ही सलामीवीरांची जोडी सर्वप्रथम मैदानात आली. राजस्थानकडून पहिल्याच षटकात न्यूझीलंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने डावाच्या पहिल्याच चेंडूवर अनपेक्षितपणे राहुलचा त्रिफळा उडवला. बोल्टने टाकलेला हा चेंडूत आतल्या बाजूने स्विंग होत थेट स्टंपमध्ये घुसला. आयपीएल २०२२ हंगामातील ही दुसरी वेळ. जेव्हा सलामीसाठी आलेला राहुल शून्य धावांवर बाद झाला. लखनऊने हंगामातील पहिला सामना गुजरात टायटन्ससोबत झाला, त्यातही राहुल एकही धाव करू शकला नव्हता.

सलग दुस-या सामन्यात राहुल गोल्डन डक (डावाच्या पहिल्या चेंडूवर बाद) झाला क्विंटन डी कॉकने ३२ चेंडूत १ षटकार आणि २ चौकार मारत ३९ धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त मार्कस स्टॉयनिसने १७ चेंडूत नाबाद ३८ तर, दीपक हुड्डाने (२५,) कृणाल पंड्याने( २२ )धावा केल्या इतर फलंदाजाला २० धावांचा आकडा पार करता आला नाही. राजस्थानकडून युझवेंद्र चहलने ४ षटकात ४१ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. ट्रेंट बोल्टने २ विकेट्स तर प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप सेन यांनी प्रत्येकी १ विकेट आपल घेतली. विशेष म्हणजे, कुलदीप सेनचे हे आयपीएल पदार्पण होते.
– डॉ.राजेंद्र भस्मे,
कोल्हापूर

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या