मुंबई: भारत आणि वेस्ट इंडिज मधील तिस-या टी २० आंतरराष्ट्रीय सामन्याची वेळ बदलण्यात आली आहे. या सामन्याचा टॉस आता ८ ऐवजी ९ वाजता होणार आहे. म्हणजे मॅच मधील पहिला चेंडू रात्री ९.३० वाजता टाकला जाईल. भारतीय वेळेनुसार, रात्री ९.३० वाजता सामना सुरु होईल. तिस्-या टी २० आंतरराष्ट्रीय सामन्याच्या वेळेत झालेल्या बदलाबद्दल बीसीसीआयकडून माहिती देण्यात आली आहे.
भारतीय क्रिकेट बोर्डाने ट्विट करुन सामन्याच्या वेळेत झालेल्या बदलाबद्दल माहिती दिली. खेळाडूंना आराम मिळावा, या हेतुने तिस-या टी २० सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. भारत आणि वेस्ट इंडिज मध्ये दुसरा टी २० सामना उशिराने सुरु झाला होता. भारतीय वेळेनुसार, रात्री उशिरा हा सामना संपला. खेळाडूंना फार थकवा जाणवू नये, यासाठी तिस-या टी २० सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
मॅचच्या वेळेबद्दल बीसीसीआयकडून ट्विट
बीसीसीआयने ट्विट करुन तिस-या टी २० सामन्याच्या वेळेबद्दल माहिती दिली आहे. तिस-या टी २० सामन्याचा टॉस भारतीय वेळेनुसार, रात्री ९ वाजता होईल. मॅचची सुरुवात 9.30 वाजता होणार आहे.
वेळेतील बदलावर दोन्ही संघ सहमत
संघाचे सामान वेळेवर न पोहोचल्यामुळे दुसरा टी २० सामनाही उशिराने सुरु झाला होता. दोन्ही संघ तिसरा टी २० सामना उशिराने सुरु करण्यावर सहमत आहेत. खेळाडूंना आराम मिळावा, हा त्यामागे हेतू आहे. हा निर्णय घेण्याआधी फ्लोरिडा मध्ये होणा-या सलग दोन सामन्यांबद्दलही विचार करण्यात आला आहे.