नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यापासून देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यामुळे गेल्या चार-पाच महिन्यांत ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना घराघरांत रुजली आहे. पण एखाद्या क्रिकेट सामन्यात ‘वर्क फ्रॉम होम’ असेल तर.. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत असे केले जाण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे.
यंदाच्या स्पर्धेमध्ये स्पर्धेचे ब्रॉडकास्टर असलेले स्टार स्पोर्टस् हे समालोचकांना घरातून कॉमेंट्री करण्याचा पर्याय खुला करून देणार असल्याची चर्चा आहे. ‘व्हर्च्युअल कॉमेंट्री’ म्हणजेच सामना एका ठिकाणी तर समालोचन विविध ठिकाणांहून अशी नवी कल्पना आयपीएलसाठी राबवण्यात येण्याची शक्यता आहे. नुकतीच दक्षिण आफ्रिकेत टी ३ सॉलिडारिटी कप स्पर्धा झाली.
या स्पर्धेतील एकमेव सामन्यात तीन संघ एकमेकांविरुद्ध खेळले आणि त्यात एबी डीव्हिलियर्सचा संघ विजेता ठरला. या स्पर्धेचे प्रसारणाचे हक्क स्टार स्पोर्टस्कडे होते. त्यामुळे आफ्रिकेतील सेंच्युरियन पार्कवर सुरू असलेल्या सामन्याचे धावते समालोचन चक्क भारतातील तीन समालोचकांनी केले.आफ्रिकेतील या सामन्यासाठी इरफान पठाणने बडोद्याच्या घरून, दीप दासगुप्ता याने कोलकातातील घरून आणि संजय मांजरेकर यांनी मुंबईच्या घरून एकत्र धावते समालोचन केले.
केवळ समालोचकच नव्हे, तर सहाय्यक कर्मचारी यांनीही देशाच्या विविध भागांतून लॉग इन करत काम केले. तर संपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे प्रमुख हे मैसून येथून वर्क फ्रॉम होम करत होते. ३६ षटकांच्या आफ्रिकेतील सामन्यासाठी जसे समालोचन करण्यात आले तीच पद्धत यंदाच्या आयपीएलसाठी वापरण्याचा विचार ब्रॉडकास्टर करत आहेत.
Read More आजी योद्धा…….अभिनेते रितेश विलासराव देशमुख यांनी शेअर केला व्हिडिओ