24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeक्रीडाभारताने पहिला वर्ल्ड कपच जिंकला हा सांघिक विजय

भारताने पहिला वर्ल्ड कपच जिंकला हा सांघिक विजय

एकमत ऑनलाईन

मुंबई : भारताने १९८३ साली आजच्याच दिवशी २५ जूनला पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने त्यावेळचा दिग्गज संघ वेस्ट इंडिजला धूळ चारली होती. वेस्ट इंडिजने त्याआधी सलग दोनदा वर्ल्ड कप जिंकला होता. भारताने त्यांची हॅट्ट्रिकची संधी हुकवली.

त्यावेळी कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्ड कप जिंकेल, याचा कोणीही विचार केला नव्हता. पण हे असे प्रत्यक्षात घडले होते. हा सांघिक विजय होता. टीममधील प्रत्येक खेळाडूने योगदान दिले होते. आता सय्यद किरमाणी यांनी या ऐतिहासिक वर्ल्ड कप विजयाबद्दलच्या त्यांच्या स्वत:च्या काही व्यक्तिगत तक्रारी मांडल्या आहेत. वर्ल्ड कप विजयातील आपल्या योगदानाची म्हणावी तितकी चर्चा झाली नाही, असे सय्यद किरमाणी यांचे मत असून याबद्दलची खंत त्यांच्या मनात आहे.

कपिल देव यांची ती संस्मरणीय खेळी
भारताचा पहिल्या वर्ल्ड कप विजयाचा प्रवास चढ-उतारांनी भरलेला होता. या स्पर्धेत कॅप्टन कपिल देव एक संस्मरणीय खेळी खेळून गेले, ज्याची आजही क्रिकेट रसिक चर्चा करतात. कपिल झिम्बाब्वेविरुद्ध ती इनिंग खेळले होते. कपिल देव यांनी अवघड परिस्थितीतून संघाला बाहेर काढले व १७५ धावा ठोकल्या होत्या.

भारताने सुरुवातीला अशक्य वाटणारा हा सामना जिंकला होता. कपिल देव ही रोमांचक फलंदाजी करू शकले, कारण त्यांना दुस-या बाजूने साथ मिळाली. त्या सामन्यात कपिल देव यांना ती साथ दिली होती सय्यद किरमाणी यांनी. ‘‘मी कपिल देवला सपोर्ट केला नसता, तर कदाचित भारत वर्ल्ड कप जिंकू शकला नसता’’ असे सय्यद किरमाणी म्हणाले.

‘‘कपिलने निश्चित १७५ धावा केल्या. लोक फक्त कपिलच्या त्या शानदार खेळीबद्दल बोलतात. कपिलला तो सपोर्ट कोणी केला? याबद्दल ते बोलत नाहीत. मी त्यावेळी कपिल देवबरोबर ती भागीदारी केली नसती तर वर्ल्ड कप जिंकण्याचा विषयच सोडून द्या.

आम्ही बाद फेरीसाठीसुद्धा पात्र ठरू शकलो नसतो. कुठला रिपोर्टर किंवा सोशल मीडियावर अजून कोणी हे लिहिलेलं नाही, की कपिलने ज्या १७५ धावा केल्या, त्यासाठी किरमाणीने त्याला सपोर्ट केला होता. भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचवण्यासाठी मदत केली होती’’ असे सय्यद किरमाणी म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या