24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeक्रीडापुढची दोन वर्षे तरी निवृत्ती नाही

पुढची दोन वर्षे तरी निवृत्ती नाही

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. फुटबॉलप्रेमींचा आवडता प्लेअर ख्रिस्तियानो रोनाल्डोचा पुढच्या दोन वर्षांसाठी निवृत्तीचा कोणताही प्लॅन नाही. रोनाल्डोला आता युरो २०२४ पर्यंत फुटबॉल खेळायचे आहे, अशी माहिती स्वत: रोनाल्डोने एका पुरस्कार सोहळ्यात दिली.

फुटबॉल फेडरेशन ऑफ पोर्तुगालने लिस्बन येथे आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यात रोनाल्डोला पोर्तुगालसाठी सर्वाधिक गोल केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. या दरम्यान तो म्हणाला, ‘माझा प्रवास अजून संपलेला नाही. मला विश्वचषक आणि युरोचा भाग व्हायचे आहे. मी यासाठी खूप उत्सुक आहे आणि माझे ध्येय अगदी स्पष्ट आहे.’

रोनाल्डोने आपल्या कारकीर्दीत पोर्तुगालसाठी १८९ सामन्यांत ११७ गोल केले आहेत. तर, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याचा विक्रम रोनाल्डोच्या नावावर होता. यावेळी रोनाल्डोने आयर्लंडविरुद्ध गोल करत इराणचा फुटबॉलपटू अली दाईच्या १०९ गोलचा विक्रम मागे टाकला. रोनाल्डो आता कतारमध्ये नोव्हेंबरमध्ये सुरू होणा-या विश्वचषक २०२२ मध्ये आपल्या देशाकडून खेळताना दिसणार आहे. ही त्याची १०वी मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा असणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या