31.8 C
Latur
Tuesday, May 11, 2021
Homeक्रीडाम्हणून, मुंबई यशस्वी संघ

म्हणून, मुंबई यशस्वी संघ

एकमत ऑनलाईन

मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या मोसमातही मुंबईचा विजय झाला. फायनलमध्ये मुंबईने दिल्लीचा ५ विकेटने पराभव केला. मुंबईची आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची ही पाचवी वेळ आहे. आतापर्यंत सर्वाधिकवेळा आयपीएल जिंकण्याचा विक्रमही मुंबईच्याच नावावर आहे. तसेच, लागोपाठ दोन आयपीएल जिंकण्याच्या चेन्नईच्या रेकॉर्डशीही मुंबईने बरोबरी केली आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमातही मुंबईच्या टीमने दमदार कामगिरी केली. आयपीएल प्ले-ऑफमध्ये पोहोचणारी मुंबई पहिलीच टीम ठरली, तसेच, लीग स्टेजमध्येही मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिली. भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याने मुंबईच्या यशस्वी असण्याचे कारण सांगितले आहे.

आयपीएलमध्ये मुंबईची टीम यशस्वी असण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, मुंबईने अनुभव आणि युवा खेळाडूंचा योग्य ताळमेळ बसवला आहे. मुंबईच्या टीममध्ये जगातले सर्वोत्तम टी-२० खेळाडू आहेत. सोबतच त्यांच्याकडे प्रतिभावान भारतीय खेळाडूही आहेत. असे प्रतिभावान खेळाडू शोधण्यासाठी त्यांनी चांगली यंत्रणा तयार केली आहे, असे द्रविड म्हणाला. याआधी खेळाडूंना फक्त त्यांच्या राज्यांकडूनच खेळण्याची संधी मिळायची. पण आता आयपीएलमध्ये कर्नाटकचा खेळाडूही मुंबईकडून खेळू शकतो. या गोष्टी आता राज्य संघांच्या हातात नाहीत, अशी प्रतिक्रिया द्रविडने दिली.

हरियाणाच्या टीमकडे युझवेंद्र चहल, अमित मिश्रा, जयंत यादव यांच्यासारखे चांगले स्पिनर आहेत, त्यामुळे राहुल तेवतियाला त्याच्या राज्याच्या टी-२० टीममध्ये संधी मिळाली नसती, पण आता त्याला त्याचं कौशल्य दाखवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आयपीएलच्या ८ टीम खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष ठेवून असतात, असे वक्तव्य राहुल द्रविडने केले. आयपीएलमध्ये ८ पेक्षा जास्त टीम असाव्या, कारण आणखी प्रतिभावान खेळाडूंना खेळण्याची आणि त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल, असे द्रविडला वाटते. न्यू इनिंग्ज या आयपीएलच्या बिजनेस मॉडेलच्या पुस्तकाच्या अनावरणावेळी राहुल द्रविड बोलत होता. आयपीएलच्या राजस्थान टीमचे सहमालक बदाले यांचे हे पुस्तक आहे.

नितळीत चोरट्यांचा धुमाकूळ; तीन घरे फोडली, दुचाकी पळविली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या