32.6 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeक्रीडापदकविजेत्या गीतावर भाजी विकण्याची वेळ

पदकविजेत्या गीतावर भाजी विकण्याची वेळ

एकमत ऑनलाईन

रांची – राज्यस्तरीय चालण्याच्या स्पर्धेत सातत्याने सरस कामगिरी केलेल्या गीताकुमारी हिच्यावर रस्त्यावर भाजी विक्री करण्याची वेळ आली आहे. आर्थिक समस्यांचा सातत्याने सामना करावा लागलेली गीता रामगढ जिल्ह्यातील रस्त्यांवर भाजीपाला विक्री करताना दिसल्याचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

राज्यासाठी विविध स्पर्धांमध्ये 8 पदके मिळविल्यानंतर गीता प्रसिद्धीच्या झोतात आली होती. तिने कोलकात्यातील स्पर्धेतही दोन पदके जिंकली होती. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी गीताला या कामगिरीसाठी 50 हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि आर्थिक मदत म्हणून दरमहा 3 हजार रुपये देखील देण्यात येतील, असे जाहीर करण्यात आले होते.

गीता बीएच्या अखेरच्या वर्षात शिकत असून राज्यासाठी सरस कामगिरी केलेल्या खेळाडूला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही अशीच कामगिरी करण्यासाठी तिला मदत केली जात असल्याचेही मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात ती रस्त्यांवर भाजीपाला विकत असल्याचे स्पष्ट झाल्यावर राज्य सरकारने जाहीर केलेली मदत तिला मिळत आहे का, तसेच अचानक असे कोणते कारण घडले की आर्थिक स्थिती खालावल्याने तिच्यावर भाजीपाला विकण्याची वेळ आली आहे याचे उत्तर मात्र, अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Read More  महाराष्ट्रात आज ५,५३७ नवीन कोरोना रुग्ण 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या