26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeक्रीडाआज महामुकाबला

आज महामुकाबला

एकमत ऑनलाईन

दुबई : टी-२० विश्वचषक २०२१ चा सर्वात मोठा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात उद्या दि. २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले असून, सामन्यापूर्वी दोन्ही संघांनी आपल्या विजयाचा दावा केला आहे. भारत-पाकिस्तान पारंपरिक प्रतिस्पर्धी असल्याने ही हायव्होल्टेज लढत आहे. त्यामुळे या सामन्याकडे सा-या जगाचे लक्ष असणार आहे. या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचे खेळाडू आक्रमक अंदाजात दिसले. दरम्यान, पाकिस्ताननेही आजच आपल्या संघाची घोषणा केली. या निमित्ताने मोका, मोकाची चर्चा चांगलीच रंगली आहे.

भारतीय संघाच्या टी-२० वर्ल्डकपमधील मोहिमेला फक्त काही तासांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. भारताची पहिली लढत कट्टर आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मासमवेत संघाने फोटोशूट केले. यामध्ये कप्तान कोहली आणि रोहितचा ‘अँग्री मॅन’ अवतार दिसला. टीम इंडियाच्या खेळाडूंच्या या फोटोशूटचा व्हिडिओ भारतीय क्रिकेट संघाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला ‘‘टी-२० विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची नवीन झलक, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये ऋषभ पंत, लोकेश राहुल, इशान किशन हेदेखील टीम इंडियाच्या नवीन जर्सीमध्ये दिसत आहेत.

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ ५ वेळा आमनेसामने आले आहेत. पण प्रत्येक वेळी टीम इंडियाने विजय मिळवला आहे. २०१६ च्या टी-२० विश्वचषकात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. यापूर्वी २०१४ आणि २०१२ मध्येही पाकिस्तानला टीम इंडियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. २००७ मध्ये झालेल्या पहिल्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तानला प्रथम साखळी आणि नंतर अंतिम फेरीत भारताकडून पराभव पत्करावा लागला होता.
या हाय व्होल्टेज सामन्यासाठी पाकिस्तानने १२ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. संघाची कमान बाबर आझमच्या हाती आहे. अनुभवी शोएब मलिक आणि मोहम्मद हाफिज यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. पाकिस्तान संघात बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, हैदर अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ यांना जागा दिली.

टी-२० साठी टीम इंडिया सज्ज
टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघ सज्ज झाला असून, पुर्ण आत्मविश्वासाने आम्ही मैदानात उतरणार आहोत. समोर मोठे आव्हान आहे. कारण पाकिस्तानची टीमदेखील शक्तीशाली आहे. त्यांच्याकडे असे काही खेळाडू आहे, जे सामन्याची दिशा बदलू शकतात. त्यामुळे आम्ही सध्या आमच्या प्लॅनवर फोकस करत आहोत, असे कोहली म्हणाला.

भारताचा दबदबा
टी-२० व्यतिरिक्त टीम इंडियाचा एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध शंभर टक्के विक्रम आहे. १९९२ ते २०१९ या कालावधीत दोन्ही संघांमध्ये ५०-५० षटकाचे एकूण सात सामने खेळले गेले आणि भारतीय संघाने सर्व जिंकले.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या