22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeक्रीडाआयपीएलचा आज ठरणार चॅम्पियन

आयपीएलचा आज ठरणार चॅम्पियन

एकमत ऑनलाईन

दुबई : आयपीएल २०२१ ची फायनल मॅच शुक्रवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. ही लढत चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. चेन्नईने आतापर्यंत ३ वेळा तर कोलकाताने २ वेळा विजेतेपद मिळवले आहे. यावेळी चेन्नईला चौथे तर कोलकाताला तिसरे विजेतेपद मिळवण्याची संधी आहे. केकेआरने २०१२ साली अंतिम फेरीत चेन्नईचा पराभव केला होता, तर दुस-यांदा २०१४ साली पंजाबचा पराभव करत विजेतेपद मिळवले होते. चेन्नईने २०१०, २०११ आणि २०१८ अशी तीन विजेतेपद मिळवली आहेत. विशेष म्हणजे धोनी उद्या आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड बनविणार आहे.

उद्या होणा-या अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने ३ वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. त्याच बरोबर चेन्नईने टी-२० चॅम्पियनस लीगचे दोन वेळा विजेतेपद मिळवले आहे. कर्णधार म्हणून धोनीने भारतीय संघाला वर्ल्डकप जिंकून दिला आहे. १५ ऑक्टोबर रोजी होणा-या आयपीएलच्या फायनल सामन्यात धोनी जेव्हा मैदानात उतरेल, तेव्हा तो टी-२० क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून ३०० वा सामना खेळले. टी-२० क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी आजवर कोणी केलेली नाही. धोनीने टी-२० मध्ये आजवर २९९ सामन्यात नेतृत्व केले आहे. यापैकी १७६ सामन्यात विजय तर ११८ लढतीत पराभव स्विकारला आहे.

२०१२ साली केकेआरने अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून जेतेपद मिळवले होते. तेव्हा चेन्नईने १९० धावांचे लक्ष्य दिले होते. चेन्नईने २० षटकात ३ बाद १९० धावा केल्या होत्या. उत्तरादाखल केकेआरने २ चेंडू राखून विजय साकारला होता. तेव्हा मलविंदर बिस्लाने ८९ तर जॅक कॅलिसने ४९ चेंडूत ६९ धावा केल्या होत्या. धोनी काही दिवसांपूर्वी चेन्नईच्या मैदानावर चाहत्यांच्या समोर अखेरचा सामना खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण त्याच बरोबर तो हेदेखील बोलला होता की पुढे काही होईल माहिती नाही. मेगा लिलाव होणार आहे. त्यानंतर कशी रणनिती आखली जाईल, हे आताच सांगू शकत नाही.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या