34 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home क्रीडा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी दोन शर्मांंना सक्तीची विश्रांती

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी दोन शर्मांंना सक्तीची विश्रांती

एकमत ऑनलाईन

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीने धक्कादायक निर्णय घेताना रोहित व ईशांन्त या दोन्ही शर्मा ना सक्तीची विश्रांती दिली. गेल्या दोन आयपीएल सामन्यात दुखापतीमुळे रोहीत खेळलेला नाही. तसेच इशांत शर्मा ही तंदुरुस्त नसल्यामुळे आयपीएल सोडून भारतात परतला आहे

प्रशिक्षक रवी शास्त्री, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरूण दुबईत दाखल झाल्याला चोविस तास होत नाही, तो पर्यंत निवड समितीने तातडीने बैठक बोलावून आज कसोटी, टी २० आणि एकदिवसीय क्रिकेटसाठी संघ जाहीर केला. बीसीसीआयने प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात रोहितच्या तंदुरुस्तीविषयी थेट उल्लेख केला नसला, तरी रोहितसह, इशांत शर्मा यांच्या तंदुरुस्तीवर बीसीसीआयचे वैद्यकीय पथक लक्ष ठेवून असल्याचे म्हटले आहे. इशांत दुखापतीमुळे आयपीएल सोडून मायदेशी परतला आहे, तर रोहित गेल्या दोन सामन्यात खेळलेला नाही.

– उपकर्णधार रोहित शर्माच्या दुखापतीचे कारण गुलदस्त्यात असून टी २०, एकदिवसीय मालिकेसाठी लोकेश राहुल उपकर्णधार आणि यष्टिरक्षक म्हणून निवडले झटपट क्रिकेटसाठी यष्टिरक्षक म्हणून रिषभ पंतच्या नावासमोर फुलीमारुन, संजू सॅमसन दुसरा यष्टिरक्षक म्हणून निवडण्यात आले
-शिखर धवनला फक्त झटपट क्रिकेटसाठी पसंती दिलीअसून

-भारतीय संघाबरोबर चार राखीव गोलंदाज राहणार आहेत
-हार्दीक पंड्याला अष्टपैलू म्हणून पसंती दिली

तीन महिन्याच्या प्रदिर्घ दौऱ्यासाठी कसोटी संघात लोकेश राहुलचे पुनरामगन झाले. त्याला विंडीजच्या २०१९ मधील मालिकेतून वगळण्यात आले होते. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून संघातून वगळण्यात आलेल्या हार्दीक पंड्याला तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले आहे.

निवड समिती अध्यक्ष सुनील जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत समितीने लेगस्पिनर वरुण चक्रवर्तीला टी २० मालिकेसाठी संघात स्थान दिले . यष्टिरक्षणासाठी रिषभ पंतच्या नावासमोर निवड समितीने फुलीच मारली असून त्यांनी एकदिवसीय आणि टी २० मालिकेसाठी संजू सॅमसनला दुसरा यष्टिरक्षक म्हणून पसंती दिली आहे.
दौऱ्याचा कालावधी लक्षात घेता निवड समितीने कमलेश नागरकोटी, कार्तिक त्यागी, इशान पोरेल आणि टी नटराजन या चार राखीव गोलंदाजांना निवडले आहे. हे चारही गोलंदाज भारतीय संघाबरोबरच असतील.

संघ – कसोटी – विराट कोहली (कर्णधार), मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार) हनुमा विहारी, शुभमन गिल, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), रिषभ पंत (यष्टिरक्षक), जसप्रित बुमरा, महंमद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, महंमद सिराज

एकदिवसीय – विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, लोकेश राहुल (उपकर्णधार, यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर, मनिष पांडे, हार्दिक पंड्या, मयांक अगरवाल, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रित बुमरा, महंमद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर

टी २० – विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयांक अगरवाल लोकेश राहुल (उपकर्णधार, यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर, मनिष पांडे, हार्दिक पंड्या, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), रवींद्र जेडाजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रित बुमरा, महंमद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, वरुण चक्रवर्ती

डॉ.राजेंद्र भस्मे

पेशावरमध्ये भीषण बॉम्बस्फोट ; 8 जणांचा मृत्यू तर 70 जण जखमी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या