19 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeक्रीडाअंडर-१७ फुटबॉल विश्वचषक : भारतीय महिल संघाची घोषणा

अंडर-१७ फुटबॉल विश्वचषक : भारतीय महिल संघाची घोषणा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय महिला अंडर-१७ फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक थॉमस डेनरबी यांनी ११ ऑक्टोबरपासून येथे सुरू होणा-या फिफा अंडर-१७ विश्वचषक स्पर्धेसाठी २१ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. यंदाच्या अंडर-१७ फुटबॉल विश्वचषकाचे यजमानपद यावेळी भारताला मिळाले आहे.

या स्पर्धेत भारत अ गटात असून त्यांच्या गटात यूएसए, मोरोक्को आणि ब्राझीलचा समावेश करण्यात आला आहे. भारत या स्पर्धेतील त्यांचा पहिला सामना ११ ऑक्टोबरला अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर १४ आणि १७ ऑक्टोबरला अनुक्रमे मोरोक्को आणि ब्राझीलविरुद्ध मैदानात उतरेल. भारतीय संघाचे सर्व सामने भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर पार पडणार आहेत.

गोलकीपर : मोनालिसा देवी मोइरंगथम, मेलोडी चानू कीशम, अंजली मुंडा.
डिफेंडर : अस्तम उरांव, काजल, नकेता, पूर्णिमा कुमारी, वार्शिका, शिल्की देवी हेमम.

मिडफील्डर : बबीना देवी लिशम, नीतू लिंडा, शैलजा, शुभांगी सिंह.
फॉरवर्ड : अनीता कुमारी, लिंडा कॉम सर्टो, नेहा, रेजिया देवी लैशराम, शेलिया देवी लोकतोंगबम, काजोल ूबर्ट डिसूजा, लावण्या उपाध्याय, सुधा अंकिता टिर्की.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या