मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहलीची मुलगी वामिका आज दोन वर्षांची झाली. नुकताच आपल्या लेकीसोबतचा गोड फोटो अनुष्काने शेअर केला आहे.
दरम्यान अभिनेत्रीने दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी आपले हृदय आनंदाने मोठे झाल्याचे सांगितले आहे. अनुष्का शर्माची लेक जन्मापासून प्रचंड चर्चेत असते. मात्र या सेलिब्रेटी कपलने आपल्या मुलीचा फोटो कोणत्याही माध्यमांना शेअर करण्यास मनाई केली आहे.
अनुष्का शर्माने आजपर्यंत आपल्या लेकीसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. मात्र तिने अद्यापही वामिकाचा चेहरा दाखवलेला नाही.
अनुष्का आणि विराट आपल्या मुलीला नेहमीच माध्यमांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात.
वामिकाच्या जन्मानंतर अनुष्काने मोठा ब्रेक घेतला होता. त्यानंतर आता ती पडद्यावर पुनरागमन करत आहे. अनुष्का शर्मा लवकरच झुलन गोस्वामीवर आधारित ‘चकदा एक्प्रेस’ या बायोपिकमध्ये दिसणार आहे.