20.5 C
Latur
Friday, November 27, 2020
Home क्रीडा वरुणने घेतली दिल्लीची फिरकी; तर हैदराबाद गारद

वरुणने घेतली दिल्लीची फिरकी; तर हैदराबाद गारद

एकमत ऑनलाईन

शनिवारच्या डबल हेडर मध्ये पहिल्या सामन्यात दिल्लीने ५९ धावानी पराभव पत्करला तर दुसर्‍या सामन्यात हैदराबादन फक्त१२धावाचा. दोन्ही संघ आव्हानांचा पाठलाग करु शकले नाहीत खरतर हैदराबादला १२७ धावांचं आव्हान फारच सोपं होतं पण तीन बाद शंभर नंतर फक्त १४ धावात अख्खा संघ गारद झाला शेवटचे चार फलंदाज रशीद खान, संदीप शर्मा ,नटराजन आणि खलील अहमद यांना भोपळाही फोडता आला नाही या सामन्याचा निकाल एवढा अनपेक्षित लागेल असे वाटले नव्हते आता हैदराबादचे तीन सामने शिल्लक असले तरी त्यांनी तिन्ही जिंकले तरी त्यांचे १६ गुण होऊ शकत नाहीत त्यामुळे त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यासारखे आहे कोलकत्ता आणि पंजाब चे आव्हान मात्र कायम राहीले

लेगस्पिनर वरुण चक्रवर्तीच्या आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर कोलकताने आज फॉर्मात असणाऱ्या दिल्लीचा ५९ धावांनी अबूधाबी वर पराभव केला. दिल्लीचा हा सलग दुसरा पराभव असला, तरी त्यांचे अजून दुसरे स्थान कायम आहे. त्यांना बाद फेरी गाठण्यासाठी तीन सामन्यातून केवळ एक विजय आवश्यक आहे. श्रेयस अय्यर च्या दिल्लीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतली पण त्याला त्याचा काही फायदा उठवता आला नाही कलकत्ताने६ बाद १९४ धावांचा डोंगर रचला. नितीश राणाच्या तडाखेबंद फलंदाजीला सुनील नारायणच्या फटकेबाजीची जोड मिळाली. या दोघांच्या फलंदाजीने कोलकाताचे आव्हान उभे राहिले. नितीन राणाने सलामीला मिळालेली बढती सार्थकी लावली. त्याने नाबाद ८१ धावांची खेळी केली. या वेळी मधल्या फळीत खेळायला आलेल्या सुनील नारायणने(६४) त्याला सुरेख साथ दिली. या दोघांच्यात ५९ चेंडूत झालेल्या ११५ धावांच्या भागीदारीमुळे कोलकाता संघाच्या आव्हानाला बळकटी आली.

राणाने १३ चौकार आणि एक षटकार लगावला, तर नारायणने चार षटकार आणि सहा चौकारांनी आपली आक्रमक फलंदाजी सजवली.त्यानंतर वरुण चक्रवर्ती ने दिल्लीच्या फलंदाजांची फिरकी घेतली. त्याच्या फिरकीसमोर दिल्लीचा डाव २० षटकांत ९ बाद १३५ असा मर्यादित राहिला. वरुण चक्रवर्तीने २० धावांत ५, तर पॅट कमिन्सने १७ धावांत ३ गडी बाद केले.आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताला पँट कमिन्सने सुरेख सुरवात करून दिली. त्याने दिल्लीच्या दोन्ही सलामीच्या फलंदाजांना अजिंक्य रहाणे (०) आणि लागोपाठ शतकी खेळी करणाऱ्या शिखर धवनला (६) पहिल्या दोन षटकांतच तंबूत पाठवले. त्यानंतर वरुणने दिल्लीच्या फलंदाजीवर नेमका घाव घातला. कर्णधार श्रेयस अय्यर(४७) आणि रिषभ पंत(३५) यांनी दोन आकडी मजल मारल्यामुळे दिल्लीला शंभरी पार करता आली वरुण चक्रवर्तीने अय्यर,पंत, हेटमायर स्तोईनिस आणि अक्षर पटेल यांना वीस धावातच तंबूचा रस्ता दाखवला

सायंकाळी झालेल्या दूबईरवरील सामन्यात ख्रिस जॉर्डन आणि अर्षदीप सिंग यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पंजाबी संघाने यंदाच्या आयपीएलमधील आपले आव्हान राखले. पंजाबी आज गमावलेला सामना १२ धावांनी जिंकताना जबरदस्त खेळाचे प्रदर्शन केले. पंजाबने आपले आव्हान राखले असले, तरी हैदराबादसाठी सर्व मार्ग बंद झाल्यातच जमा आहे. प्रथम फलंदाजी करताना पंजाबच्या फलंदाजांनाही फार काही करता आले नव्हते. त्यांनाही २० षटकांत ७ बाद १२६ असे समाधान मानावे लागले होते. त्यानंतर हैदराबाद संघाला आपल्या प्रतिकाराचे रुपांतर विजयात करता आले नाही. त्यांचा डाव १९.५ षटकांत ११४ धावांत संपुष्टात आला.

आव्हानाचा पाठलाग करताना जॉनी बेअरस्टॉ(१९) आणि डेव्हिड वॉर्नर(३५) यांनी नेहमीप्रमाणे हैदराबाद संघाला पावरप्ले मध्ये छप्पन धावांची चांगली सलामी करून दिली होती. त्यांनी धावांचा वेग राखला होता. पण, गेल्या काही सामन्यात हैदराबादची फलंदाजी या दोघांपाशी सुरू होते आणि त्यांच्यापाशीच संपते असे चित्र होते आणि आजही तेच झाले. या दोन्ही फलंदाजांनंतर मनीष पांडे (१५)हा एकमात्र भरवशाचा फलंदाज त्यांच्या संघात आहे. मात्र, त्यालाही सातत्य राखता आलेले नाही. आजही वॉर्नर आणि बेअरस्टॉ दोन धावांच्या अंतराने बाद झाल्यावर हैदराबादचा डाव घसरला. पांडे आणि विजय शंकर (२६)यांनी तो सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विकेट राखल्या पण, त्यांना डावाला वेग देता आला नाही. त्यांनी जवळजवळ दहा षटकात फक्त ४२ धावा काढल्या या मधल्या षटकांत बिष्णोईच्या फिरकीने त्यांच्या फलंदाजीला वेसण घातली ओआणि त्या दडपणाचा सामना करताना त्यांचे फलंदाज बाद झाले.

सोळाव्या षटकानंतर ३ बाद १०० अशा स्थितीत २४ चेंडूंत २६ धावांचे आव्हान असताना हैदराबादचे अखेरचे सात फलंदाज १४ धावांत बाद झाले. यातील त्यांच्या अखेरच्या चार फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. अखेरची तीन षटके खरे तर फलंदाजाची मात्र या वेळी ती षटके हैदराबादसाठी घातक ठरली. जॉर्डननो १९व्या आणि अर्षदीपने २० षटकांत लागोपाठ दोन दोन गडी बाद करून सामन्याचा निकाल आपल्या बाजूने केला. हैदराबादन नाणेफेक जिंकून फलंदाजी दिली प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघालाही फार काही मोठी मजल मारता आली नव्हती. कर्णधार राहुलने(२७) मनदीपच्या(१७)साथीत दिलेली ३७ धावांची सलामीच त्यांच्यासाठी महत्वाची ठरली. त्याचा ख्रिस गेल (२०)नेहमीप्रमाणे झटपट येऊन झटपट धावा करून बाद झाला. निकोलस पूरन(३२) व ग्लेन मैक्सवेल(१२) काही प्रभाव टाकू शकले नाहीत पंजाबचाही एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नव्हता. अखेरच्या सहा षटकांत त्यांनी केवळ ४१ धावा केल्या. मात्र, त्यांनी संथ झालेल्या खेळपट्टीवर सव्वाशेची मजल मारण्याचे काम केले यामुळेच त्या ना विजयाच समाधान मिळाले.

डॉ.राजेंद्र भस्मे

दिशाभूल करायला आम्ही लहान मुलं नाही – ओवेसी

ताज्या बातम्या

वीजबिलात सवलतची घोषणा करताना घाई, चूक झाली – अशोक चव्हाण यांची प्रांजळ कबुली

मुंबई,दि.२६ (प्रतिनिधी) लॉकडाऊनच्या काळात आलेल्या भरमसाठ वीजबिलात सवलत देण्याची घोषणा करताना उर्जामंत्री नितीन राऊत यांनी घाई केली. पक्षात आणि सरकारमध्ये घोषणा करण्याआधी चर्चा करायला...

आता सरकारला शॉक द्यावा लागेल -राज ठाकरे

मुंबई,दि.२६ (प्रतिनिधी) कोरोनाचे संकट असतानाही सरकारचे डोळे उघडावेत यासाठी आमच्यावर रस्‍त्‍यावर उतरून आंदोलन करण्याची, मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. राज्‍य सरकार जर जनतेला वाढीव...

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान !

मुंबई, दि.२६ (प्रतिनिधी) २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १२ वर्ष पूर्ण झाली. दहशतवाद्यांशी मुकाबला करताना प्राणाची आहुती देणाऱ्या वीर पोलीस...

लातूर रेल्वे बोगी प्रकल्पात फेब्रुवारीत प्रत्यक्ष उत्पादन

चाकूर : मराठवाड्याच्या विकासात महाक्रांती आणणा-या व येथील तरुणांना रोजगाराची दारे खुली करणा-या लातूर येथील मराठवाडा रेल्वे बोगी प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले असून...

नव्या रेल्वे मार्गामुळे दक्षिण भाग जोडला जाणार

निलंगा : निजामकाळापासून (गेल्या ७२ वर्षांपासून) दक्षिण भाग रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी धूळखात पडून असलेल्या रेल्वे मार्गाला अखेर माजीमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नांतून मंजुरी...

नौदलात दोन प्रीडेटर ड्रोन दाखल

नवी दिल्ली: चीनबरोबरच्या तणावाच्या पार्श्वभुमीवर भारताने अमेरिकेकडून दोन प्रीडेटर ड्रोन भाडेतत्त्वावर घेतली आहेत. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर ही ड्रोन तैनात केले जाण्याची शक्यता...

एक देश, एक निवडणूक ही काळाची गरज

गांधीनगर : एक देश एक निवडणूक ही देशाची गरज आहे. देशात प्रत्येक महिन्यात कोणत्या ना कोणत्या ठिकाणी निवडणुका होत असतात. यावर विचार सुरू केला...

मुंबईवर हल्ल्याचे इस्त्रायलमध्ये स्मारक

तेल अवीव: मुंबईत २००८ मध्ये झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यात भारतासह इतर देशांतील नागरिकांचा मृत्यू झाला होता. दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ इस्रायलमध्ये एक...

लालूप्रसाद यादवांविरोधात पोलिसांत तक्रार

पाटणा : चारा घोटाळा प्रकरणातील दोषी राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यापुढे नवे संकट निर्माण झाले आहे. चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगत असतानाही मोबाईलद्वारे बिहारच्या...

आशिया खंडात भारत लाचखोरीत अव्वलस्थानी

नवी दिल्ली : एका सर्वेक्षणातून संपूर्ण आशिया खंडात भारतात सर्वाधिक लाचखोर असल्याचे समोर आले आहे. भारतात लाचखोरीचे प्रमाण हे ३९ टक्के असल्याचे या ट्रान्सपरन्सी...

आणखीन बातम्या

वीजबिलात सवलतची घोषणा करताना घाई, चूक झाली – अशोक चव्हाण यांची प्रांजळ कबुली

मुंबई,दि.२६ (प्रतिनिधी) लॉकडाऊनच्या काळात आलेल्या भरमसाठ वीजबिलात सवलत देण्याची घोषणा करताना उर्जामंत्री नितीन राऊत यांनी घाई केली. पक्षात आणि सरकारमध्ये घोषणा करण्याआधी चर्चा करायला...

आता सरकारला शॉक द्यावा लागेल -राज ठाकरे

मुंबई,दि.२६ (प्रतिनिधी) कोरोनाचे संकट असतानाही सरकारचे डोळे उघडावेत यासाठी आमच्यावर रस्‍त्‍यावर उतरून आंदोलन करण्याची, मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. राज्‍य सरकार जर जनतेला वाढीव...

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान !

मुंबई, दि.२६ (प्रतिनिधी) २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १२ वर्ष पूर्ण झाली. दहशतवाद्यांशी मुकाबला करताना प्राणाची आहुती देणाऱ्या वीर पोलीस...

नौदलात दोन प्रीडेटर ड्रोन दाखल

नवी दिल्ली: चीनबरोबरच्या तणावाच्या पार्श्वभुमीवर भारताने अमेरिकेकडून दोन प्रीडेटर ड्रोन भाडेतत्त्वावर घेतली आहेत. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर ही ड्रोन तैनात केले जाण्याची शक्यता...

एक देश, एक निवडणूक ही काळाची गरज

गांधीनगर : एक देश एक निवडणूक ही देशाची गरज आहे. देशात प्रत्येक महिन्यात कोणत्या ना कोणत्या ठिकाणी निवडणुका होत असतात. यावर विचार सुरू केला...

मुंबईवर हल्ल्याचे इस्त्रायलमध्ये स्मारक

तेल अवीव: मुंबईत २००८ मध्ये झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यात भारतासह इतर देशांतील नागरिकांचा मृत्यू झाला होता. दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ इस्रायलमध्ये एक...

लालूप्रसाद यादवांविरोधात पोलिसांत तक्रार

पाटणा : चारा घोटाळा प्रकरणातील दोषी राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यापुढे नवे संकट निर्माण झाले आहे. चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगत असतानाही मोबाईलद्वारे बिहारच्या...

आशिया खंडात भारत लाचखोरीत अव्वलस्थानी

नवी दिल्ली : एका सर्वेक्षणातून संपूर्ण आशिया खंडात भारतात सर्वाधिक लाचखोर असल्याचे समोर आले आहे. भारतात लाचखोरीचे प्रमाण हे ३९ टक्के असल्याचे या ट्रान्सपरन्सी...

दिशाच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे नाहीच

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियान हिच्या दिशाच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा अशी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती....

‘निवार’धडकले , पण नुकसान नाही

चेन्नई : निवार चक्रीवादळाने गुरुवारी पहाटे अंधारातच तमिळनाडू, पुद्दुच्चेरीला धडक दिली. मात्र किनारपट्टीसह अंतर्गत भागात कोणतेही नुकसान न करता पुढे गेले. भारतीय हवामान विभागाच्या...
1,347FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...