24.8 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeक्रीडाआयपीएल आणि पीएसएलमध्ये खूप फरक: अक्रम

आयपीएल आणि पीएसएलमध्ये खूप फरक: अक्रम

एकमत ऑनलाईन

कराची : भारतीय क्रिकेटमध्ये आयपीएल ही एक लोकप्रिय स्पर्धा आहे. आतापर्यंत आयपीएलमधील अनेक सामने रंगतदार झाले आहेत. आयपीएलचे आयोजन पाहूनच काही वर्षांपासून पाकिस्तानमध्येदेखील पीएसएलचे आयोजन करण्यात येऊ लागले आहे. या स्पर्धेतदेखील अनेक प्रतिभावंत खेळाडूंचा समावेश आहे. आयपीएलमधील गोलंदाजीचा दर्जा हा आयपीएलपेक्षा चांगला असल्याचे वक्तव्य माजी कर्णधार वसीम अक्रमने केले होते. पण आता मात्र आयपीएल स्पर्धा ही पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेपेक्षाच नव्हे तर जगातील सर्वोत्तम स्पर्धा असल्याची कबुली अक्रमने दिली आहे.आयपीएल आणि पीएसएलमध्ये खूप फरक आहे.

गेल्या पाच-सहा वर्षांत या दोन स्पर्धांमध्ये खूपच तफावत जाणवू लागली आहे आयपीएलमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा ओतला जातो. एका संघाचे बजेट ६० ते ८० कोटी इतके असते. म्हणजे पीसीएलच्या अंदाजे दुप्पट त्यामुळे त्यातून होणारा नफादेखील जास्त असतो. तोच आर्थिक नफा बीसीसीआय देशांतर्गत स्पर्धांसाठी वापरते. म्हणूनच आयपीएल ही जगातील सर्वांत मोठी क्रिकेट स्पर्धा आहे’’, असे वसीम अक्रम म्हणाला.

‘‘आयपीएलमधील खेळाडूंपैकी बहुतांश खेळाडूंचे वैयक्तिक स्तरावर प्रशिक्षक असतात. खेळाडू अशा माजी क्रिकेटपटूंची निवड प्रशिक्षक म्हणून करतात ज्यांनी आधी त्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करून दाखवली आहे. त्यामुळेच आयपीएलमध्ये खेळताना खेळाडूंचा उत्साह आणि आत्मविश्वास दुप्पट असतो’’, असेही अक्रम म्हणाला.याआधी एका मुलाखतीत वसीम अक्रम म्हणाला होता, ‘‘मी गेली पाच वर्षे पीसीएलचा भाग आहे. पीसीए कसे आहे हे मी पाहिले आहे.

Read More  झाडावर चढून आत्महत्येचा प्रयत्न

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या