23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeक्रीडाविनोद कांबळीला महिना १ लाख पगाराची ऑफर

विनोद कांबळीला महिना १ लाख पगाराची ऑफर

एकमत ऑनलाईन

मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सचिन तेंडूलकरचा खास मित्र विनोद कांबळी सध्या आर्थिक संकटात आहेत. बेरोजगार विनोद कांबळीला फायनान्स कंपनीत महिना १ लाख पगाराची ऑफर मिळाली आहे. बीसीसीआयकडून मिळणा-या ३० हजार रुपयांच्या पेंशनवर तो आपले घर चालवतो आहे.

एक काळ असा होता जेव्हा विनोद कांबळी म्हणजे क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातील ताईद होता. काही जण तर त्याला सचिन पेक्षा मोठा फलंदाज मानायचे. पण काळाची चक्र फिरली अन् आज विनोद पैशांसाठी संघर्ष करतोय. पण आता विनोदच्या मदतीसाठी सह्याद्री मल्टीस्टेटचे चेअरमन संदीप थोरात धावून आले आहेत. त्यांनी विनोदला लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी ऑफर केली आहे.

संदीप थोरात यांनी विनोद कांबळीला नोकरी ऑफर केली. सह्याद्री मल्टीस्टेट ही एक फायनान्स कंपनी आहे. या कंपनीची एक शाखा मुंबईमध्ये सुरु होणार आहे. त्या शाखेच्या व्यवस्थापक पदासाठी त्यांनी विनोद कांबळीला विचारलं आहे. या कामासाठी विनोदला दर महिना १ लाख रुपये पगार मिळेल. आता ही नोकरी स्विकारायची की नाही?

हा सर्वस्वी निर्णय विनोदचा असेल असंही ते म्हणाले. बीसीसीआयकडून मिळणारे ३० हजार रुपयांचे पेन्शन हेच विनोदचे एकमेव उत्पन्न आहे. बोर्डाकडून मिळणा-या मदतीसाठी तो आभार देखील व्यक्त करतो. विनोदने २०१९ मध्ये मुंबई टी-२० लीगमध्ये एका संघाचे प्रशिक्षक म्हणून काम केले होते.

भारताकडून विनोदने २००० साली अखेरचा सामना खेळला होता. मात्र फक्त १७ सामन्यानंतर तो संघाबाहेर झाला. वयाच्या २३व्या वर्षी त्याने अखेरची कसोटी खेळली होती, त्याची सरासरी ५४ होती. मात्र पुन्हा तो संघात येऊ शकला नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या