22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeक्रीडाविराटने बदलला लूक; नवीन हेअरस्टाईलचे फोटो व्हायरल

विराटने बदलला लूक; नवीन हेअरस्टाईलचे फोटो व्हायरल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २० सप्टेंबरपासून तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. विराट कोहलीही टीमसोबत मोहालीला गेला आहे. विराट कोहली या मालिकेपूर्वी त्याच्या केसांमुळे चर्चेत आला आहे. कोहलीची ही हेअरस्टाईल क्रिकेट चाहत्यांना खूप आवडली असून कोहलीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

त्याने रशीदकडून त्याचे केस कापले आहेत आणि त्याचा नवीन लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रशीदने स्वत: विराटसोबतचा फोटो शेअर केला आहे. यासोबत त्याने ‘किंग स्वत: विथ द किंग’ असे लिहून विराट कोहलीला टॅग केले आहे. या पोस्टमध्ये विराट आपला अंडरकट फ्लॉट करताना दिसत आहे.

या पोस्टवर प्रतिक्रिया देताना गायक हार्डी संधूने ‘छा गये गुरू’ असे लिहिले आहे. सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट रशीद सलमानीने विराटच्या आधी हार्दिक पांड्याला नवा लूक दिला आहे. रशीदने यापूर्वीही हार्दिकसोबतचा फोटो शेअर केला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या