22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeक्रीडाएका पोस्टसाठी विराट घेतो ८ कोटी ७० लाख रुपये

एका पोस्टसाठी विराट घेतो ८ कोटी ७० लाख रुपये

एकमत ऑनलाईन

मुंबई : टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहली सध्या त्याच्या कारकीर्दीमधील सर्वांत खराब फॉर्ममध्ये आहे. त्याने शतक झळकावून आता अडीच वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौ-यातही तो काहीच कमाल करू शकला नाही. त्याच्या टीममधील जागेवर प्रश्न विचारले जात आहेत. मैदानात सातत्याने फ्लॉप होणा-या विराटचा सोशल मीडियावर दरारा कायम आहे.

विराट कोहली इन्स्टाग्रामवर एका प्रायोजित पोस्टसाठी तब्बल ८ कोटी ७० लाख रुपये घेतो. एका पोस्टच्या माध्यमातून सर्वांत जास्त कमाई करणारा तो आशियाई सेलिब्रिटी ठरला आहे.

२०२२ मधील इन्स्टाग्राम रिच लिस्ट प्रसिद्ध केली आहे. या यादीवरून विराट आजही सोशल मीडियावर सुपरहिट असल्याचे सिद्ध झाले आहे. विराट मागच्या वर्षी एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी ६ कोटी घेत होता. तसेच तो जागतिक यादीमध्ये १८व्या क्रमांकावर होता. वर्षभरात त्याची फीस ३ कोटी ४० लाखांनी वाढली आहे. त्याच्या जागतिक क्रमावारीतही सुधारणा झाली असून त्याने १४ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

जगभरातील खेळाडूंच्या यादीत ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लियोनेल मेस्सी यांच्यानंतर विराटचा नंबर आहे. रोनाल्डो एका पोस्टचे १९.१७ कोटी तर मेस्सी एका पोस्टचे १४.२१ कोटी घेतो.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या