18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeक्रीडाविराटने धोनीला दिले सरप्राईज

विराटने धोनीला दिले सरप्राईज

एकमत ऑनलाईन

शारजाह : आयपीएल २०२१ मधील ३५व्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जने शानदार कामगिरी करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ६ विकेटनी पराभव केला आणि गुणतक्त्यात अव्वल स्थान पुन्हा एकदा मिळवले. गेल्या वर्षी सीएसकेची कामगिरी चांगली झाली नव्हती. त्यांना प्लेऑफमध्ये देखील पोहोचता आले नव्हते. पण या वर्षी त्यांनी जबरदस्त कमबॅक केलेय.

बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात ड्वेन ब्रावोने अफलातून गोलंदाजी केली. त्याने २४ धावा देत ३ विकेट घेतल्या. अखेरच्या षटकात ब्रावोने आरसीबीच्या फलंदाजांना धावा करू दिल्या नाहीत. विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी शतकी सुरुवात करून देखील आरसीबीला फक्त १५६ धावा करता आल्या. या सामन्यात आरसीबीचा पराभव झाला असला तरी धोनी आणि विराट यांच्यातील खास मैत्री सर्वांना दिसली. सामना सुरू होण्याआधी आलेल्या वादळामुळे नाणेफेक होण्यास उशीर झाला. या वेळेत हे दोन्ही खेळाडू एकमेकांसोबत बोलत थांबले होते.

त्यानंतर सामना झाल्यावर विराटने धोनीला एक सरप्राईज दिले. धोनी अन्य खेळाडूंसोबत बोलत असताना विराटने मागून त्याला मिठी मारली. या घटनेचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
आयपीएलनंतर होणा-या टी-२० वर्ल्डकपमध्ये धोनी देखील भारतीय संघासोबत असणार आहे. विराट वर्ल्डकपनंतर टी-२० संघाचे कर्णधारपद सोडणार आहे. या स्पर्धेत धोनी मेंटॉर म्हणून टीम इंडियासोबत असेल.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या