23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeक्रीडाविराट कोहलीच भारतीय संघाचा कर्णधार

विराट कोहलीच भारतीय संघाचा कर्णधार

एकमत ऑनलाईन

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा व्हाईट बॉल कॅप्टन रोहित शर्मा असेल, या चर्चांना बीसीसीआयने पूर्णविराम दिला आहे. विराट कोहलीच भारतीय संघाचा कर्णधार असेल असे बीसीसीआयचे खजिनदार अरूण धुमाळ यांनी म्हटले आहे.

कर्णधारपद रोहित शर्माकडे जाणार नसून विराट कोहलीच क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटसाठी भारताचा कर्णधार राहणार असल्याचे बीसीसीआयचे खजिनदार अरूण धुमाळ यांनी कअठर शी बोलताना सांगितले.

धुमाळ म्हणाले, हे सगळे खोटे आहे. असे काहीही केले जाणार नाही. ही फक्त मीडियामध्ये सुरु असलेली चर्चा आहे. या मुद्द्यावर बीसीसीआयची कोणतीही बैठक वा चर्चा झालेली नाही. विराटच सगळ्या फॉरमॅटसाठीचा कॅप्टन असेल. कर्णधार आणि फलंदाज म्हणूनही विराट कोहलीचा फॉर्म गेले काही दिवस चांगला नाही, ऐन मोक्याच्या क्षणी विराट कोहली आपल्या नावाला साजेशी कामगिरी करू न शकल्याने संघ अडचणीत आल्याने त्यावरून चर्चांना सुरुवात झाली होती.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या