19.8 C
Latur
Monday, December 5, 2022
Homeक्रीडाविराटला तिस-या टी २० सामन्यात विश्रांती?

विराटला तिस-या टी २० सामन्यात विश्रांती?

एकमत ऑनलाईन

मुंबई : भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तीन टी २० सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून मालिका आधीच खिशात टाकली आहे. रविवारी झालेल्या सामन्यात भारताने १६ धावांनी विजय मिळवला होता. आता तिसरा टी २० सामना हा ४ ऑक्टोबरला इंदौर येथे होणार आहे. या सामन्यात भारताच्या काही महत्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. यात कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा देखील समावेश असू शकतो.

काही दिवसांपूर्वी विराट कोहलीची टी २० संघातील जागा धोक्यात असल्याचे मानले जात होते. आता एका महिन्याच्या विश्रांतीनंतर त्याने टीम इंडियात झोकात पुनरागमन केले. आशिया कपमध्ये त्याने बहुप्रतिक्षित ७१ वे शतक ठोकले. त्यानंतर आता त्याचे संघातील स्थान मजबूत झाले आहे. त्याने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेत देखील आपला चांगला फॉर्म दाखवून दिला. दरम्यान, बीसीसीआयच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार विराट कोहलीला दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या शेवटच्या टी २० सामन्यात विश्रांती दिली जाण्याची दाट शक्यता आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या