22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeक्रीडाविराटने भाड्यावर घेतला किशोर कुमारांचा बंगला

विराटने भाड्यावर घेतला किशोर कुमारांचा बंगला

एकमत ऑनलाईन

मुंबई: विराट कोहली मुंबईत हॉटेल बिझनेस मध्ये उतरणार आहे. लवकरच विराटच्या मालकीच रेस्टॉरंट मुंबईत सुरु होणार आहे. यासाठी विराटने एक जागा सुद्धा भाड्यावर घेतली आहे. विराट कोहली एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या बंगल्यात आपलं रेस्टॉरंट उघडणार आहे. विराटला ही जागा प्रचंड आवडली आहे.

विराट कोहलीच हे रेस्टॉरंट जुहू मध्ये असणार आहे. त्यासाठी विराटने प्रसिद्ध गायक, अभिनेते किशोर कुमार यांच्या बंगल्याचा मोठा भाग भाड्यावर घेतला आहे. येथे एका हाय ग्रेड रेस्टॉरंटच काम चालू आहे. जुहू मध्ये किशोर कुमार यांचा बंगला आहे. तिथे सध्या दररोज काम सुरु आहे. एका ऑनलाइन पोर्टलने हे वृत्त दिले आहे. विराट कोहलीच हे नवीन रेस्टॉरंट जवळपास बनून तयार झालेआहे.

विराट कोहली पुढच्या महिन्यात कधीही हे रेस्टॉरंट सुरु करु शकतो, अशी माहिती आहे. अमित कुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. लीना चंदावरकर यांचा मुलगा सुमीत काही महिन्यांपूर्वी विराट कोहलीला भेटला. दोघांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर रेस्टॉरंट सुरु करण्याचा निर्णय झाला. आम्ही ५ वर्षांसाठी विराट कोहलीला ही जागा भाडेतत्त्वावर दिली आहे, असं अमित कुमार म्हणाले. विराटचे देशातील अनेक भागात त्याची रेस्टॉरंट्स आहेत.

विराट कोहलीचा कपड्यांचा ब्रँड
विराट कोहलीने काल हाँगकाँग विरुद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकवले. पण त्याआधी तो बराच काळ खराब फॉर्म मध्ये होता. अजूनही विराट कोहलीला सूर गवसलाय असे म्हणता येणार नाही. विराट कोहलीची एक इमेज आहे. सोशल मीडियावर त्याची मोठी फॅन फॉलोइंग आहे. क्रिकेटर म्हणून विराट कोहली पैसा कमावतोच आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या