नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंचा बोलबाला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. तर दुस-या क्रमांकावर इमाम-उल-हकने बाजी मारली आहे.
गेल्या काही दिवसांपासून बाबर आणि इमाम यांनी खो-याने धावा काढल्या आहेत. त्यामुळेच त्यांना क्रमवारीत फायदा झाल्याचे दिसतेय. दुसरीकडे भारताचे माजी आणि आजी कर्णधार तिस-या आणि चौथ्या क्रमांकावर विराजमान आहेत. विराट कोहलीची एका स्थानाने घसरण झाली आहे.
विराटची तिस-या क्रमांकावर घसरण झाली आहे. तर रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर आहे. पहिल्या दहा जणांमध्ये भारत आणि पाकिस्तान संघाचे प्रत्येकी दोन दोन खेळाडू आहेत. पाचव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक आहे.