27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeक्रीडाविरुष्का च्या संसाराला तीन वर्षे पूर्ण!

विरुष्का च्या संसाराला तीन वर्षे पूर्ण!

एकमत ऑनलाईन

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघांसाठी ११ डिसेंबर हा दिवस खूप खास आहे. तीन वर्षांपूर्वी, ११ डिसेंबर २०१७ रोजी हे दोघेही लग्नबंधनात अडकले होते. त्यानिमित्ताने विराटने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. चाहते या जोडप्याला विरुष्का या नावाने संबोधू लागले.

विराटने ट्विटरवरून शेअर केला फोटो
विराटने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक गोंडस फोटो शेअर केला आहे. त्यात अनुष्का शर्मा हसून विराटकडे पाहत आहे, तर विराट कोहलीही तिच्याकडे पाहत आहे. हा फोटो शेअर करताना विराटने कॅप्शनमध्ये लिहिले की, ३ वर्षे आणि आयुष्यभर एकत्र.

इटलीमध्ये केले होते लग्न
विराट-अनुष्काने इटलीच्या टस्कीन या शहरात लग्न केले होते. हा लग्नाचा वाढदिवस विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यासाठीही पुन्हा एका गोष्टीमुळे खास आहे. कारण पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात त्यांच्या घरी पाळणा हलणार आहे. पालकत्व रजा घेतल्यामुळे या मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळून विराट मायदेशी परतणार आहे.

पवार साहेब महाराष्ट्राची शान : नवनीत राणा

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या