22.9 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeक्रीडाविवो नसणार यंदा आयपीएलचा टायटल स्पॉन्सर

विवो नसणार यंदा आयपीएलचा टायटल स्पॉन्सर

एकमत ऑनलाईन

मुंबई : आयपीएल 2020 संदर्भात बीसीसीआयने चिनी कंपनी विवोसोबत असलेला टायटल स्पॉन्सर करार बीसीसीआयने स्थगित केला आहे. भारत आणि चीन यांच्यात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने हा महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे.

बीसीसीआयने या संदर्भात केवळ एक ओळीचं निवेदन दिलं आहे. आयपीएलने घेतलेल्या या निर्णयामुळे यंदा आयपीएलचं टायटल स्पॉन्सर चिनी कंपनी असलेली विवो नसणार हे स्पष्ट झालं आहे. बीसीसीआयने दिलेल्या प्रसिद्धीपत्राकानुसार, बीसीसीआय आणि विवो मोबाइल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने 2020 या वर्षात इंडियन प्रीमिअर लीगसाठी आपली भागीदारी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

2018 ते 2022 या पाच वर्षांसाठी विवोने 2190 कोटी रुपये मोजून आयपीएलचे प्रायोजकत्वाचे अधिकार मिळवले होते. बीसीसीआयने आता आपल्या नियमांनुसार, नवीन टायटल स्पॉन्सरसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यंदा आयपीएलची सुरूवात २९ मार्च रोजी होणार होती मात्र, कोरोनामुळे आयपीएलची तारीख पुढे ढकलण्यात आली. यंदाचा आयपीएल सीजन हा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लांबवणीवर पडला आहे. आता हा आयपीएल युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून आयपीएलला सुरूवात होणार आहे. आयपीएल 2020ची फायनल मॅच 10 नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा आयपीएल सीजन हा परदेशात आयोजित करावा लागत आहे.

मागील काही दिवसांपासून भारत आणि चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण स्थितीमुळे बीसीसीआयने विवो कंपनी यंदाच्या आयपीएलची टायटल स्पॉन्सर नसणार हे जाहीर केलं आहे.

Read More  मुंबईत पावसाचा लॉकडाऊन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या