23.8 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeक्रीडावॉर्नची विराटवर स्तुतिसुमने!

वॉर्नची विराटवर स्तुतिसुमने!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये भारताने २-१ अशी आघाडी घेतली आहे. ओव्हलवर साहेबांच्या संघाला १५७ धावांनी धूळ चारत भारताने आपले कसोटी क्रिकेटमधील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या बहारदार कामगिरीचे सर्वच स्तरांतून कौतुक होत असताना ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू शेन वॉर्न याने विराट कोहलीवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला आहे. ‘विराट कोहली हा क्रिकेट जगतातला सर्वांत मोठा सुपरस्टार आहे’, असे शेन वॉर्न म्हणाला. तिस-या कसोटी सामन्यानंतर एका क्रीडा वाहिनीवर झालेल्या चर्चेमध्ये शेन वॉर्नने विराट कोहलीचे कौतुक केले आहे.

शेन वॉर्नने यावेळी बोलताना विराट कोहलीच्या नेतृत्वगुणांचा विशेष करून उल्लेख केला. ‘‘कोहली हा क्रिकेट जगतातला सर्वांत मोठा सुपरस्टार आहे. भारतीय क्रिकेटपटू त्याला खूप मानतात. सर्वच खेळाडूंना त्याचा आदर वाटतो’’ असे शेन वॉर्न म्हणाला.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या