24.4 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeक्रीडाचीनने कोरोना पसरवून काय साधले?

चीनने कोरोना पसरवून काय साधले?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रसार संपूर्ण जगात झालेला आहे. चीनमधून कोरोनाचा प्रसार सुरू झाला, हे सर्वांनाच माहिती आहे. पण कोणीही चीनवर कारवाई करण्यासाठी पुढे येताना दिसत नाही. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग चीनवर चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला आहे. चीनने कोरोना पसरवून काय साधले, याचे उत्तर आता हरभजनने दिले आहे. हरभजनने एक बातमी ट्विट केली आहे.

या बातमीमध्ये कालच्या दिवशी चीनमध्ये कोरोनाचा एकही नवीन रुग्ण सापडला नाही, अशी माहिती देण्यात आली होती. संपूर्ण जग एका बाजूला कोरोनाशी लढते आहे, तर दुसरीकडे चीनमध्ये मात्र साधारण परिस्थिती असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुले चीनचा कोरोना पसरवण्याचा प्लॅन होता, असे हरभजनच्या बोलण्यातून वाटत आहे. ही बातमी ट्विट करताना हरभजन म्हणाला की, कोरोना व्हायरस जगभरात पसरवण्याचा चीनचा प्लॅन होता.

Read More  उस्मानाबादेत जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद

सध्याच्या घडीला संपूर्ण जग कोरोना व्हायरसमुळे त्रस्त आहे. पण दुसरीकडे चीनमध्ये काहीच परिणाम आता दिसत नाही. आता ते संपूर्ण जगाकडे पाहून हसत असतील. त्याचबरोबर आता आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी ते पीपीई किट्स आणि मास्क बनवून संपूर्ण जगाला विकत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या