22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeक्रीडाक्या फेंकता है....! ; सेहवागच्या नीरजला खास शैलीत शुभेच्छा

क्या फेंकता है….! ; सेहवागच्या नीरजला खास शैलीत शुभेच्छा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ‘क्या फेंकता है..’ म्हणत भारताचा दिग्गज क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने ऐतिहासिक कामगिरी करणा-या नीरज चोप्राला आपल्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. नीरज चोप्राने वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकीत रौप्य पदक पटकावले.

त्याने ८८.१३ मीटर भालाफेक करत पदकाला गवसणी घातली. त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर त्याच्यावर सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.

वीरेंद्र सेहवागने ट्विट करत नीरजला शुभेच्छा दिल्या आहेत. इतकेच नव्हे तर त्याने नीरजला खास संदेशही दिला आहे. आजपासून काही वर्षांनी तरुणांची एक पिढी येणार आहे ज्यांच्यासाठी ‘क्या फेंकता है’ ही एक मोठी प्रशंसा ठरणार आहे. चॅम्पियन नीरज चोप्राचे आभार. पुन्हा एकदा जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदकासह भारताला अभिमान वाटावा अशी कामगिरी.

पंतप्रधान मोदी यांनी केले कौतुक
‘‘आपल्या देशाच्या दिग्गज खेळाडूंपैकी एक असलेल्या नीरज चोप्राने मोठे यश संपादन केले आहे. या जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ऐतिहासिक रौप्य पदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन. भारतीय खेळांसाठी हा खास क्षण आहे. नीरज चोप्राला त्याच्या पुढील स्पर्धेसाठी आणि भविष्यासाठी शुभेच्छा.’’ अशा आशयाचे ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या