26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeक्रीडाराज्य ‘राजेश्वरी’चेच, श्रीलंकेला दिला व्हाईट वॉश!

राज्य ‘राजेश्वरी’चेच, श्रीलंकेला दिला व्हाईट वॉश!

एकमत ऑनलाईन

पल्लेकेले : भारत आणि श्रीलंका यांच्यातील महिला क्रिकेट संघात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने श्रीलंकेला ३-० असा व्हाईट वॉश दिला.

तिस-या सामन्यात प्रथम फलंदाजी करणा-या भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी २५६ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान श्रीलंकेला पेलवले नाही. त्यांचा संपूर्ण संघ २१६ धावात पॅव्हेलियनमध्ये पोहचला. भारताकडून राजेश्वरी गायकवाडने ३ तर मेघना सिंह आणि पूजा वस्त्राकर यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. श्रीलंकेकडून निलाक्षी डिसेल्वाने सर्वाधिक ४८ धावा केल्या. तर चामरी आटापटू (४२) हसिनी परेरा (३९) यांनी देखील प्रतिकार केला.

भारताचे २५६ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेची सुरूवात खराब झाली. त्यानंतर मात्र चामरी आटापटूने डाव सावरण्यास सुरूवात केली. तिने ४४ धावांची खेळी केली. मात्र कर्णधार हरमनप्रीतने कर्णधार आटापटूला बाद करत मोठा धक्का दिला. दरम्यान, हसिनी परेराने ३९ धावा करत डाव सावला. मात्र राजेश्वरी गायकवाडने परेराला बाद करत श्रीलंकेच्या आशेला सुरूंग लावला. त्यानंतर मधल्या फळीला फारशी चमक दाखवता आली नाही. दुस-या बाजूने निलाक्षी डिसेल्वाने नाबाद ४८ धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली. मात्र दुस-या बाजूने तिला म्हणावी तशी साथ मिळाली नाही. अखेर भारताने श्रीलंकेचा डाव ४७ व्या षटकात २१६ धावांवर संपुष्टात आणला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या