26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeक्रीडादीपक हुड्डाने प्रसिद्ध कृष्णाची जर्सी का घातली?

दीपक हुड्डाने प्रसिद्ध कृष्णाची जर्सी का घातली?

एकमत ऑनलाईन

लंडन : भारतीय संघाने दुस-या एकदिवसीय सामन्यात यजमान वेस्ट इंडिजचा २ गडी राखून पराभव केला. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. टीम इंडियाचा विंडीजवरचा हा सलग १२ वा एकदिवसीय मालिका विजय आहे. भारताने हा विक्रम नोंदवताच पाकिस्तानचा विक्रमही उद्ध्वस्त केला. पाकिस्तान संघाने झिम्बाब्वेविरुद्ध सलग ११ एकदिवसीय मालिका जिंकली आहे. पण दुस-या एकदिवसीय सामन्यात दीपक हुड्डा वेगवान गोलंदाज कृष्णाच्या जर्सीत दिसला.

यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला लोकांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. प्रसिद्ध कृष्णा या सामन्यात प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. त्याच्या जागी आवेश खानला वनडेमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. विंडीजला पहिला धक्का दीपक हुड्डाने दिला. त्याने काइल मेयर्सला त्याच्याच चेंडूवर बाद केले. या सामन्यात हुड्डाच्या या विकेटपेक्षा त्याच्या जर्सीचीच जास्त चर्चा झाली. सामन्याच्या सुरुवातीला हुड्डाच्या जर्सीच्या मागील बाजूस टेप होता. खेळ पुढे जात असताना हुडाच्या जर्सीतून टेप निघून गेला. त्यानंतर ही जर्सी त्या प्रसिद्ध कृष्णाची असल्याचे आढळून आले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या