22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeक्रीडारोहितने मैदानातच धरला कार्तिकचा गळा

रोहितने मैदानातच धरला कार्तिकचा गळा

एकमत ऑनलाईन

मोहाली : ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहाली टी २० सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा ४ गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाने ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात टीम इंडियाला २०८ धावांचे लक्ष्य राखता आले नाही. ऑस्ट्रेलियाने १९.४ षटकात २०९ धावा करत सामना जिंकला.

या सामन्यादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने यष्टीरक्षक दिनेश कार्तिकचा गळा धरला होता. यांचा व्हीडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांच्यात नेमके काय झाले होते, यावर सूर्यकुमार यादवने वक्तव्य केले आहे. सूर्यकुमार यादव म्हणाला की, मोहाली टी-२० सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांच्यात फक्त विनोद झाला होता. दोन्ही खेळाडू खूप दिवसांपासून एकत्र खेळत आहेत. त्यामुळे हे खूप सामान्य आहे. पहिल्या टी २० सामन्यादरम्यान कर्णधार रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिकचा विनोद करतानाचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हीडीओमध्ये दोन्ही मस्करी करताना रोहित दिनेश कार्तिकचा गळा धरताना दिसत आहेत.

पहिल्या टी-२० सामन्यादरम्यान दिनेश कार्तिकने ग्लेन मॅक्सवेलचा झेल पकडला, परंतु त्याने बाद करण्याचे अपील केले नाही. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने मजेदार पद्धतीने दिनेश कार्तिकची गळा पकडली होता. या संपूर्ण प्रकरणावर सूर्यकुमार यादव म्हणाले की, जेव्हा डीआरएसचा विचार केला जातो तेव्हा काही वेळा आवाज फार मागे जात नाही. या सामन्यात भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण अत्यंत निराशाजनक होते. संघाने तीन झेल सोडले. या पराभवात क्षेत्ररक्षणासोबतच गोलंदाजीही खराब होती. अक्षर पटेल वगळता सर्वांनी भरपूर धावा दिल्या.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या