25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeक्रीडावामिकाचा फोटो का काढता?

वामिकाचा फोटो का काढता?

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री, निर्माती अनुष्का शर्मा ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. विराट- अनुष्काची मुलगी वामिका ही सोशल मीडियावर चर्चेत असते. अजूनपर्यंत तिच्या नावाचीच चर्चा आहे. तिचा फोटो अजून काही व्हायरल झालेला नाही. तो व्हायरल होऊ नये यासाठी अनुष्का आणि विराटने खूप काळजी देखील घेतली आहे.

मात्र काही पापाराझ्झीने तिचे फोटो व्हायरल केले आहेत. हे अनुष्काला दिसून आले आहे. त्यानंतर तिने संताप व्यक्त केला आहे. आपण कधीही काही गोष्टी गांभीर्याने घ्यायला मागत नाही. मी जर माझ्या मुलीचा फोटो नाही घ्यायचा असं सांगितलं तरी तिचा फोटो घेण्यासाठी पापाराझ्झी एवढं जिवाचं रान का करतात, असा प्रश्न अनुष्काने विचारला आहे.

विरुष्का या नावाने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा ओळखले जातात. त्यांना वामिका नावाची मुलगी आहे. तिच्या जन्मापासूनच ती सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

सेलिब्रेटी किड्स म्हटलं की त्याची चर्चा होते. त्यांना पाहण्यासाठी कमालीची उत्सुकता असते. करिना कपूर आणि सैफ अली खानचा पहिला मुलगा तैमूर याच्याबाबतही पापाराझ्झींनी कहर केला होता. काही करून त्याची पहिली झलक आपल्याला मिळावी असा त्यांचा अट्टाहास होता. त्यावरून सैफ आणि करिनाने त्यांना अनेदका झापले देखील होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या