26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeक्रीडामिताली राज राजकारणात प्रवेश करणार?

मिताली राज राजकारणात प्रवेश करणार?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताची स्टार महिला क्रिकेटपटू मिताली राजने शनिवारी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. त्यानंतर मिताली राज राजकारणात प्रवेश करणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे. तेलगू राज्यात भाजप मजबूत पकड बनवण्याच्या तयारीत लागली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप तेलगू राज्यातील दिग्गजांना आपल्या पक्षात सामील करण्याचा प्रयत्न करत आहे. याच दरम्यान, मिताली राज आणि जे. पी. नड्डा यांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोनंतर विविध चर्चांना सुरुवात झाली आहे.

जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या भेटीनंतर मिताली राज राजकीय कारकीर्दीला सुरुवात करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे, तेलगू राज्यात भाजप स्वत:ला मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपने मिताली राजला त्यांच्या पक्षात सामील करून घेतल्यास त्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. मिताली राजची जगातील महान महिला क्रिकेटपटूंच्या यादीत गणना केली जाते.

मिताली राजने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मिताली राजने १९९९ मध्ये भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मितालीने तिच्या २३ वर्षांच्या कारकीर्दीत अनेक मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिने सर्वाधिक धावा केल्या आहेत. तिची एकदिवसीय कारकीर्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपेक्षाही मोठी आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या