21.8 C
Latur
Wednesday, October 21, 2020
Home क्रीडा आव्हानांचा पाठलाग करणारे विजयी

आव्हानांचा पाठलाग करणारे विजयी

एकमत ऑनलाईन

शनिवारी झालेल्या सामन्यात पाठलाग करणारे संघ पराभूत झाले होते तर आज रविवारी आव्हानांचा पाठलाग करणारे दोन्ही राजस्थान आणि मुंबई पाच गडी राखून विजयी झाले या विजयामुळे राजस्थानने स्पर्धेतील आव्हान राखले तर मुंबई निम्म्या स्पर्धेनंतर अव्वल स्थानावर आली राजस्थानला जणू अशक्य वाटणाऱ्या विजयाला गवसणी घालण्याची सवय झालीय हैदराबाद विरुद्ध रविवारी मिळविलेल्या विजयावरून तरी ते सिद्ध झाले. राजस्थानने शारजातील सामन्यात सर्वाधिक २२६ धावा करून पंजाबवर अशक्यप्राय विजय मिळवला होता राजस्थानने आज दुबईतील सामना पाच गडी राखून जिंकताना आपले आव्हान राखून ठेवले.

आयपीएलमध्ये शनिवारी पंजाबने कोलकता विरुद्ध जिंकलेला सामना हरला. रविवारी मात्र राजस्थान ने हैदराबादविरुद्ध हरलेला सामना जिंकून दाखवला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २० षटकांत ४ बाद १५८ धावा केल्या. मनिष पांडेचे अर्धशतक आणि डेव्हिड वॉर्नरच्या ४८ धावा महत्वाच्या ठरल्या. राजस्थान रॉयल्सने ५ बाद १६३ धावा करून विजय मिळविला. राहुल टिवाटिया आणि रियान पराग यांची नाबाद पंच्याऐंशी धावांची भागीदारी निर्णायक ठरली. त्यामुळेच विजयी षटकार मारल्यानंतर परागने नृत्य करून आपला आनंद साजरा केला.आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा डाव १२ षटकांत ५ बाद ७८ असा अडचणीत आला होता. बेन स्टोक्सला आपली छाप पाडता आली नाही. बटलरला खलील अहमदने स्थिरावू दिले नाही. स्मिथ विनाकारण धावबाद झाला.

सॅमसन आणि रॉबिन उत्थप्पा रशिद खानला चकले. पाऊणशे धावांत निम्मा संघ गारद झाला असताना राजस्थान आव्हाना पर्यंत पोचण्याचे प्रश्नचिन्ह उभे होते पुन्हा एकदा राजस्थानसाठी राहुल टिवाटिया धावून आला. अशक्य वाटणाऱ्या राजस्थानच्या आव्हानात टिवाटियाने अशी काही जान आणली की पुन्हा एकदा तो त्यांच्या विजयाचा हिरो ठरला. पंजाबविरुद्ध अशाच सामन्यात शेल्डन कॉट्रेलला पाच षटकार मारणाऱ्या टिवाटियाने आज रशिद खानला रिव्हर्स स्विप मारण्याचे धाडस दाखवले. अठराव्या षटकांत त्याने तीन चौकार लगावून सामन्याचे चित्रच पालटवून टाकले.टिवाटियापासून जणू १८ वर्षीय रियान परागने प्रेरणा घेत वैयक्तिक १२ धावांवर मिळालेल्या जीवदानाचा पूर्ण फायदा उठवला. तोपर्यंत त्याने एक चौकारही मारला नव्हता. पण,त्यानंतर दोन चौकार आणि दोन षटकार ठोकून ४२ धावांची सामना जिंकून देणारी केली.तत्पूर्वी राजस्थानच्या गोलंदाजांनी केलेल्या अचूक कामगिरीमुळे हैदराबादच्या फलंदाजांना फारसे स्वातंत्र्य घेता आले नाही.

बेअरस्टॉ लवकर बाद झाला. पण, त्यानंतर वॉर्नर आणि मनिष पांडे यांनी ७३ धावांची भागीदारी केली. एरवी ही भागीदारी चांगली होती. पण, आज त्यांना भागीदारीत आक्रमकता हवी होती. तिच त्यांना आणता आली नाही. पंधराव्या षटकांत ही जोडी फुटली, तेव्हा त्यांना शंभरीही गाठता आली नव्हती. त्यानंतर उर्वरित फलंदाज दडपणाखाली डावाला वेग देऊ शकले नाहीत. केन विल्यम्सन टिकल्यामुळे त्यांना किमान दीडशेची मजल मारणे तरी शक्य झाले. मुंबईने सांघिक खेळाचे सुरेख प्रदर्शन करताना अबुधाबी येथे झालेल्या सामन्यात दिल्लीची घोडदौड रोखली. त्यांनी पाच गडी राखून विजय मिळवत गुणतक्त्यात पुन्हा एकदा आघाडी घेतली.

दिल्ल्लीने प्रथम फलंदाजी घेतल्यानंतर ४ बाद १६२ धावांची मजल मारली. यात शिखर धवनच्या (६९) अर्धशतकाचा मोठा वाटा होता. मुंबई इंडियन्स संघाने १९.४ षटकांत ५ बाद १६६ धावा केल्या. क्वींटॉन डी कॉक आणि सूर्यकुमार यादव यांची भागीदारी मुंबईसाठी महत्वाची ठरली.आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरवात चांगली होती. पण, त्यांना कर्णधार रोहित शर्मााला लवकर परतावे लागले. त्यानंतर डी कॉक(५३) आणि सूर्यकुमार(५३) यांनी संयमाने सेहेचाळीस धावांची भागीदारी करत मुंबईचा डाव सावरला या भागीदारीत वेग आणि आक्रमकता होती. त्यामुळे नंतर येणाऱ्या फलंदाजांना आत्मविश्वास मिळाला, मधल्या षटकांत मुंबईने दोन गडी झटपट गमावले. पण, पोलार्डच्या अनुभवाने त्यांची पकड निसटू दिली नाही. कृणाल पंड्याच्या साथीत त्याने मुंबईचा विजय साकार केल प्रथम फलंदाजी घेणाऱ्या दिल्लीला फलंदाजांनी दगा दिला. पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांची सलामी रंगली नाही. शॉ लवकर बाद झाला.

यंदाच्या मोसमात प्रथमच फलंदाजीला उतरलेल्या अजिंक्य रहाणेने चेंडूला धाव या गतीने १५ धावांची खेळी केली वेळीच शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांच्यातील ८५ धावांची भागीदारीनेच दिल्लीच्या डावाला आधार दिला. मात्र, श्रेयस अय्यरची जेव्हा गरज होती तेव्हा तो बाद झाला. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात त्यांना वेगाने धावा करता आल्या नाहीत. शिखर धवन नाबाद राहिला

रोलॅं गँरोवर नदालच ‘सम्राट’
स्पेनच्या रॅफेल नदाल याने रविवारी रोलॅं गेरॉंच्या क्ले कोर्टवरील आपणच अनभिषिक्त सम्राट असल्याचे दाखवून दिले. नदालने फ्रेंच ओपनच्या अंतिम लढतीत रविवारी अव्वल मानांकित नोव्हाक जोकोविचचा ६-०, ६-२, ७-५ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. या विजयाने नदालने दोन विक्रमांना गवसणी घातली. त्याने कारकिर्दीत १३वे फ्रेंच आणि एकूणातले २०वे विजेतेपद मिळविले. त्याने या कामिगरीने रॉजर फेडररच्या २० विजेतीपदाच्या कामगिरीशी बरोबरी केली.

नदालने आज जोकोविचला सपशेल निष्प्रभ केले. रोलॅं गँरोवर त्याचा हा एकतर्फी वर्चस्व राखणारा खेळ होता. नदालच्या एकतर्फी विजयामुळे टेनिस शौकिनांना अंतिम लढतीचा आनंद घेता आला नाही. पण, नदालच्या क्ले कोर्टवरील वर्चस्वावर ठसठशीत मोहोर उमटवला टेनिस कारकिर्दीत वीस विजेतीपदे मिळविणाऱ्यांच्या पंक्तीत बसणारा नदाल चौथा टेनिसपटू ठरला. मार्गारेट कोर्ट (२४), सेरेना विल्यम्स (२३), स्टेफी ग्राफ (२२) या तीन महिला टेनिसपटूच आता त्याच्या पुढे आहेत.

-डॉ.राजेंद्र भस्मे

लातूर जिल्ह्यात ५५ नवे रुग्ण

ताज्या बातम्या

दोन आणि तीन पदरी मास्क ३ ते ४ रुपयांना मिळणार : राजेश टोपे

मुंबई : कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी महत्वाचा घटक असलेल्या मास्कची किंमत निश्चित करून योग्य त्या किमतीत नागरिकांना मास्क मिळावे यासाठी पुढाकार घेणारे राज्य म्हणून...

मराठी भाषेचा ऍमेझॉन ऍपमध्ये समावेश

मुंबई : ऑनलाइन शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेले ऍमेझॉन ऍप आता मनसेच्या इशा-यापुढे नमले आहे. कारण ऍमेझॉन ऍपमध्ये मराठी भाषेचा समावेश केला जाणार आहे. ऍमेझॉन ही...

शेतक-यांच्या दु:खाचे होऊ नये हसू!

हे वर्ष जगाच्या इतिहासात मानवाचे सत्व पाहणारे वर्ष म्हणूनच नोंदविले जाईल, यावर आता राज्यापुरते तरी शिक्कामोर्तबच झाले आहे. अगोदर कोरोनाने सगळा देश ठप्प करून...

नियोजनाचा ‘अंधार’

देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये काही तासांसाठी वीजपुरवठा खंडित झाला आणि पाहता पाहता देशभरात त्याची चर्चा सुरू झाली. या ‘बत्ती गुल’चा फटका लोकल सेवा, मुंबई...

क्वाड आणि आत्मनिर्भर भारत

टोकिओमध्ये काही दिवसांपूर्वी अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत या चतुष्कोनी समूहाची (क्वाड) बैठक झाली. परराष्ट्रमंत्री स्तरावरील ही दुसरी बैठक होती. या बैठकीत भारताचे परराष्ट्रमंत्री...

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी साधला थेट शेतकऱ्यांशी संवाद

औरंगाबाद, दिनांक 20 : वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी पैठण तालुक्यातील मुरमा आणि औरंगाबाद तालुक्यातील पिंपळगाव या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट शेतकर्‍यांशी...

प्रथमच देशात करण्यात आली हिंगाची लागवड

नवी दिल्ली : भारतातील जवळजवळ सर्वच घरांमध्ये आवर्जून आढळणा-या मसाल्याच्या पदार्थांपैकी एक म्हणजे हिंग. मात्र तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण भारतीय जेवणाचा अविभाज्य भाग...

राहुल गांधींनी त्या बहिणींना दिला न्याय

वायनाड : काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी आपल्या मतदारसंघाच्या दौ-यावर आहेत. यावेळी त्यांनी सर्वस्व गमावलेल्या दोन बहिणींना घराच्या चाव्या सुपूर्त केल्या. या...

भारताविरुध्द इसिस चा कट उघडकीस

नवी दिल्ली : भारताविरूद्ध सुरू असलेला आयएसआयएस आतंकवादी संघटनेचा मोठा प्लॅन उघडकीस आला असून, आयएसआयएस आतंकवादी संघटनेचे एक द्वेषपूर्ण डिजिटल मासिक हाती लागले आहे. भारताविरूद्ध...

केंद्राकडे बोट दाखविणे म्हणजे सरकारचा नाकर्तेपणा

उस्मानाबाद : राज्य सरकारमध्ये तीन पक्ष असल्याने प्रचंड मतभेद आहेत. परंतू कांही ही झाले तरी केंद्र सरकारकडे बोट दाखविले जाते. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीसह सर्वकांही...

आणखीन बातम्या

दोन आणि तीन पदरी मास्क ३ ते ४ रुपयांना मिळणार : राजेश टोपे

मुंबई : कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी महत्वाचा घटक असलेल्या मास्कची किंमत निश्चित करून योग्य त्या किमतीत नागरिकांना मास्क मिळावे यासाठी पुढाकार घेणारे राज्य म्हणून...

मराठी भाषेचा ऍमेझॉन ऍपमध्ये समावेश

मुंबई : ऑनलाइन शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेले ऍमेझॉन ऍप आता मनसेच्या इशा-यापुढे नमले आहे. कारण ऍमेझॉन ऍपमध्ये मराठी भाषेचा समावेश केला जाणार आहे. ऍमेझॉन ही...

शेतक-यांच्या दु:खाचे होऊ नये हसू!

हे वर्ष जगाच्या इतिहासात मानवाचे सत्व पाहणारे वर्ष म्हणूनच नोंदविले जाईल, यावर आता राज्यापुरते तरी शिक्कामोर्तबच झाले आहे. अगोदर कोरोनाने सगळा देश ठप्प करून...

प्रथमच देशात करण्यात आली हिंगाची लागवड

नवी दिल्ली : भारतातील जवळजवळ सर्वच घरांमध्ये आवर्जून आढळणा-या मसाल्याच्या पदार्थांपैकी एक म्हणजे हिंग. मात्र तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण भारतीय जेवणाचा अविभाज्य भाग...

राहुल गांधींनी त्या बहिणींना दिला न्याय

वायनाड : काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी आपल्या मतदारसंघाच्या दौ-यावर आहेत. यावेळी त्यांनी सर्वस्व गमावलेल्या दोन बहिणींना घराच्या चाव्या सुपूर्त केल्या. या...

भारताविरुध्द इसिस चा कट उघडकीस

नवी दिल्ली : भारताविरूद्ध सुरू असलेला आयएसआयएस आतंकवादी संघटनेचा मोठा प्लॅन उघडकीस आला असून, आयएसआयएस आतंकवादी संघटनेचे एक द्वेषपूर्ण डिजिटल मासिक हाती लागले आहे. भारताविरूद्ध...

चीनला ४० हजार कोटींचा फटका

नवी दिल्ली : दिवाळी अवघ्या महिनाभरावर आली आहे. करोना संकट आणि निर्बंधामुळे अजूनही बाजारात लगबग सुरु झालेली नाही. तरीही याच दिवाळीत चीनचे मात्र दिवाळे...

रब्बी हंगामात अखंडित वीजपुरवठा करणार ! ऊर्जामंत्री नितीन राऊत

मुंबई, दि. २०(प्रतिनिधी) येत्या रब्बी हंगामात प्रामुख्याने कृषिपंपांना अखंडित वीजपुरवठा होईल, अशी ग्वाही राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. राज्याचे वीजक्षेत्र सध्या प्रतिकूल...

अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्ते व पुलांची तातडीने दुरुस्ती करा !

मुंबई, दि.२० (प्रतिनिधी) मुसळधार पावसामुळे शेती व घरांबरोबरच रस्त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. पुरामुळे रस्ते आणि पूलही वाहून गेले आहेत. त्यामुळे अशा रस्त्यांचे आणि...

प्लाझ्मा थेरपी परिणामकारक नाही

नवी दिल्ली : कोरोना रुग्णांवर करण्यात येणारी प्लाझ्मा थेरपी परिणामकारक नसल्याची माहिती आयसीएमआर कडून देण्यात आली आहे. लवकरच कोरोना रुग्णांसाठी ठरवलेल्या राष्ट्रीय आरोग्य उपचार...
1,308FansLike
118FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...