25.1 C
Latur
Tuesday, March 2, 2021
Home क्रीडा विजयी सलामी : चेन्नईची मुंबई इंडियन्सवर मात

विजयी सलामी : चेन्नईची मुंबई इंडियन्सवर मात

एकमत ऑनलाईन

अबुधाबी : आयपीएल्स स्पर्धेच्या शुभारंभाच्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने मुंबई इंडियन्सचा ५ गडी आणि ४ चेंडू शिल्लक ठेवून पराभव केला. अंबाती रायडू आणि डु प्लेसिस चेन्नईच्या विजयाचे शिल्पकार ठरले. १बळी आणि ६ चेंडूत १८ धावा काढणा-या सॅम करनला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

चेन्नईने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेतले. मुंबईच्या फलंदाजांनी निराशा केली. सौरभ तिवारीच्या ४२ धावा वगळता बाकीच्या फलंदाजांनी निराशा केली. २० षटकांत मुंबईने १६२ अशी मजल मारली. लुंगी एंगिडीने ३८ धावांत ३ बळी घेतले. १६३ धावांचा पाठलाग करताना मुरली विजय व वॉटसन झटपट बाद झाले. डु प्लेसिस आणि अंबाती रायडूने तिस-या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी करीत चेन्नईला सावरले. रायडूने ४८ चेंडूत ७१ धावा काढताना ६ चौकार व ३ षटकार ठोकले. डु प्लेसिस ५८ वर नाबाद राहिला.

निराधार पेन्शनधारकांवर महाविकास आघाडी सरकारने आनली उपासमारीची वेळ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या