26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeआंतरराष्ट्रीयमहिला खेळाडूंनाही मिळणार पुरुष क्रिकेटपटूंइतकेच मानधन

महिला खेळाडूंनाही मिळणार पुरुष क्रिकेटपटूंइतकेच मानधन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पुरुष क्रिकेटसह आता महिला क्रिकेटलाही मोठी पसंती मिळू लागली आहे. दिवसेंदिवस महिला क्रिकेटबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर न्यूझिलंड क्रिकेट बोर्डाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

न्यूझिलंडच्या महिला क्रिकेटपटूंनाही आता आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उच्चस्तरीय सामन्यांसाठी पुरुष क्रिकेटपटूंइतकेच पैसे मिळणार असल्याची न्यूझिलंड क्रिकेट बोर्डाने घोषणा केली आहे. यापुढे पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना समान वेतन मिळणार आहे. यासाठी पाच वर्षांचा करार करण्यात आला आहे.

या करारामुळे न्यूझिलंडमधील महिला क्रिकेटपटूंना देण्यात येणा-या करारांची संख्याही वाढते आणि नवोदित खेळाडूंसाठी उपलब्ध स्पर्धात्मक सामन्यांची संख्या वाढते. व्हाईट फर्न्सची कर्णधार सोफी डेव्हाईन म्हणाली की, हा करार महिला क्रिकेटसाठी गेम चेंजर असेल. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत महिला खेळाडूंना पुरुषांसोबत समान करारामध्ये मान्यता मिळणे ही खूप मोठी गोष्ट आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या