24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeक्रीडामहिला आशिया कपचे वेळापत्रक जाहीर

महिला आशिया कपचे वेळापत्रक जाहीर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पुरुष टी-२० आशिया चषक संपल्यानंतर आशियाई क्रिकेट परिषदेने महिला टी- २० आशिया कपचे वेळापत्रक जाहीर केले आहे. महिला टी-२० आशिया चषक १ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे आणि १५ ऑक्टोबरला संपणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शहा यांनी मंगळवारी महिला टी-२० आशिया कपचे वेळापत्रक जाहीर केले. यावेळी पुरुषांपाठोपाठ महिला आशिया चषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानविरुद्ध ७ ऑक्टोबरला सामना होणार आहे.

बांगलादेशमध्ये पुढील महिन्यापासून महिला टी-२० आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आशिया कपमध्ये भारताचा सामना ७ ऑक्टोबरला पाकिस्तानशी होणार आहे. ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने आयोजित केली जाईल. ज्या अंतर्गत अव्वल चार क्रमांकावर असलेले संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. त्याचबरोबर आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान, यजमान बांगलादेश, श्रीलंका, यूएई, थायलंड आणि मलेशियाचे संघ सहभागी होणार आहेत.

तालिबानच्या राजवटीनंतर अफगाणिस्तानमध्ये महिला संघ आशिया चषकमध्ये नाही. आशिया चषकाचा पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात १ ऑक्टोबरला होणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या