25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeक्रीडामहिला क्रिकेटर राचेल हेन्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

महिला क्रिकेटर राचेल हेन्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक विजेती रॅचेल हेन्सने गुरुवारी (१५ सप्टेंबर) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आगामी महिला बिग बॅश लीग ही तिच्या कारकीर्दीतील शेवटची स्पर्धा असेल, याचीही तिने पुष्टी केली आहे.

निवृत्तीची घोषणा करताना रॅचेल हेन्स म्हणाली की, अनेक लोकांच्या पाठिंब्याशिवाय या स्तरावर खेळणे शक्य झाले नसते. क्लब, राज्य, प्रशिक्षक, कुटुंब आणि मित्रांकडून, माझ्या क्रिकेटच्या प्रवासात ज्यांनी मला मदत केली त्या लोकांची मी खूप आभारी आहे. विशेषत: मला माझे आई-वडील इयान आणि जेनी आणि जोडीदार लिया यांच्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानायचे आहेत.

माझ्या कारकीर्दीत माझ्या सर्व सहका-यांमुळेच इतके दिवस क्रिकेट खेळता आले. त्यांनी नेहमीच मला उत्कृष्ट आणि चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा दिली. मला त्यांच्याकडून मैदानावर आणि मैदानाबाहेरील ब-याच गोष्टी शिकता आल्या. तसेच एक व्यक्ती म्हणून नेहमीच चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यात मदत केली आणि क्रिकेटला मजेदार बनवले.

रॅचेल हेन्सची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
हेन्सने तिच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत ६ कसोटी, ७७ एकदिवसीय आणि ८४ टी-२० सामने खेळले आहेत. कसोटीत हेन्सने ३९.८५ च्या स्ट्राईक रेटने ३८३ धावा केल्या आहेत. ज्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिच्या नावावर २ हजार ५८५ धावांची नोंद आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये हेन्सने दोन शतके ठोकली आहेत. तर, १९ अर्धशतके केली आहेत. याशिवाय, टी-२० क्रिकेटमध्ये तिने २६.५६ च्या स्ट्राईक रेटने ८५९ धावा केल्या आहेत. ज्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. हेन्सने २०१७ च्या आयसीसी महिला विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या संघाचे नेतृत्व केले आहे. तसेच हेन्स ही तिच्या शानदार क्षेत्ररक्षणासाठी देखील ओळखली जायची.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या