26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeक्रीडापाकिस्तानवर भारताचा विजय

पाकिस्तानवर भारताचा विजय

एकमत ऑनलाईन

महिला क्रिकेट संघाने फोडला विजयाचा नारळ

बर्मिंगहॅम : राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा ८ विकेट्सनी पराभव करत आपला पहिला विजय साजरा केला. भारताने पाकिस्तानचे १०० धावांचे माफक आव्हान १२ व्या षटकात दोन फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. भारताकडून स्मृती मानधनाने ४२ चेंडूत नाबाद ६३ धावांची आक्रमक खेळी केली. तर गोलंदाजीत स्रेह राणा आणि राधा यादव यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

पाकिस्तान महिला क्रिकेट संघाने भारतासमोर विजयसाठी १०० धावांचे आव्हान ठवले. हे आव्हान पार करताना स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी ६१ धावांची सलामी दिली. स्मृती मानधनाने षटकार खेचत आपले अर्धशतक दणक्यात साजरे केले.

दरम्यान, शेफाली बाद झाल्यानंतर आलेल्या एस. मेघनाने स्मृतीला चांगली साथ देत भारताला १० षटकात ९२ धावांपर्यंत पोहचवले. मात्र विजयासाठी ६ धावांची गरज असताना तिला ओमैमा सोहैलने १४ धावांवर बाद केले. अखेर स्मृती आणि जेमिमाहने १२ व्या षटकात भारताला विजय मिळवून दिला. स्मृतीने ४२ चेंडूत नाबाद ६३ धावा केल्या.

मेघना सिंहने इराम जावेदला शुन्यावर बाद करत पहिला धक्का दिला. मात्र त्यानंतर पाकिस्तानची कर्णधार बिसमाह मारूफ आणि मुनीबा अली यांनी दुस-या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचत डाव सावरला. मात्र स्रेह राणाने ८ व्या षटकात बिसमाह मारूफ (१७) आणि मुनीबा मारूफला (३२) पाठोपाठ बाद करत पाकिस्तानला दोन मोठे धक्के दिले.

यानंतर आलेल्या पाकिस्तानच्या इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. सोहैल आणि नसीम या दोघींनी प्रत्येकी १० धावांची भर घालत पॅव्हेलियनमध्ये परतल्या. तर आलिया रियाझ १८ धावांवर धावबाद झाली. त्यानंतर याच सामन्याच्या १७ व्या षटकात सहाव्या चेंडूवर कैनात इम्तियाज देखील भोपळाही न फोडता माघारी गेली.
शेवटच्या षटकात राधा यादवने दियाना बैगला शुन्यावर स्टम्पिंग करत पाकिस्तानला आठवा धक्का दिला. त्यानंतर तुबा हसन देखील १ धाव करून धावबाद झाली. डावाच्या शेवटच्या चेंडूवर राधा यादवने कैनतचा त्रिफळा उडवत पाकिस्तानला ९९ धावांवर गुंडाळले.
टेबल टेनिस : उपांत्यपूर्व फेरी जिंकली
भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीत ३-० अशी आघाडी घेतली आहे. साथियानने दुसरा एकेरीचा सामना जिंकला. साथियानने हा सामना ११-२, ११-३, ११-५ असा जिंकला. यासह भारताने उपांत्य फेरीत धडक मारल. भारताचा पुढील सामना आता नायजेरियाशी होणार आहे.

श्रीहरी स्विमिंगमध्ये अंतिम फेरीत
स्विमिंगमध्ये भारताच्या श्रीहरी नटराजने ५० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये दुसरे स्थान पटकावले. त्याने २५.५२ अशी वेळ नोंदवली आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला.

बॉक्ंिसगमध्ये निखतचा विजय
भारतीय महिला बॉक्सर निखत जरीनने ५० किलो वजनी गटात हेलेनाचा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला आहे. निखतने हा सामना ५-० ने जिंकला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या