24.6 C
Latur
Saturday, January 16, 2021
Home क्रीडा फक्त २७ चेंडूंत मिळवला विजय ; मुंबई इंडियन्सचा विक्रम मोडला

फक्त २७ चेंडूंत मिळवला विजय ; मुंबई इंडियन्सचा विक्रम मोडला

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आयपीएलचा १३वा हंगाम सुरू होण्यासाठी काही दिवस शिल्लक आहते. त्याआधी या स्पर्धेचे सर्वाधिक विजेतेपद मिळवणा-या मुंबई इंडियन्स संघाचा १२ वर्षे जुना विक्रम मोडला गेला आहे. हा विक्रम कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेतील सेंट लूसिया जोउक्स या संघाने मोडला आहे.

सीपीएल स्पर्धेतील लूसियाने गयाना अमेझन वॉरियर्सविरुद्ध ९३ चेंडू राखून विजय मिळवला. टी-२० लीग स्पर्धेच्या इतिहासात ९३ चेंडू राखून मिळवलेला हा सर्वांत मोठा विजय ठरला आहे. याआधी हा विक्रम आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाच्या नावावर होता. त्यांनी २००८ साली कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ६८ धावांचे लक्ष्य असताना ८७ चेंडू राखून विजय मिळवला होता. लूसिया संघाने फक्त ४.३ षटकांत म्हणजे २७ चेंडंूत विजय मिळवला.

स्पर्धेतील दुस-या सेमीफायनलमध्ये प्रथम फलंदाजी करत गयाना संघ फक्त ५५ धावांवर बाद झाला. या कामगिरीसह गयाना संघाने एक नकोसा विक्रम स्वत:च्या नावावर केला. टी-२० स्पर्धेतील नॉकआऊट फेरीतील ही दुस-या क्रमांकाची धावसंख्या आहे. पहिल्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेतील प्रो-२० सीरिजमधील ईगल्स संघाने ४७ धावा केल्या होत्या. त्रिनिदाद येथे झालेल्या सामन्यातील विजयासह लूसिया संघाने प्रथमच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

गयाना संघाकडून चंद्रपॉल हेमराजने सर्वाधिक २५ धावा केल्या. अन्य फलंदाजांना ११ पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत. त्यांचा पूर्ण संघ १३.४ षटकात बाद झाला. फक्त ५६ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या लूसिया संघाने १० विकेटनी विजय मिळवला. रहकीम कॉर्नवालने १७ चेंडूत नाबाद ३२ तर देयालने १० चेंडूत नाबाद १९ धावा केल्या.

मी जगले किंवा मेले तरी तुम्हाला एक्सपोज केल्याशिवाय राहणार नाही-कंगना

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,408FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या