22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeक्रीडाहार्दिक पांड्यामुळे वर्ल्ड कप हरलो; रवी शास्त्रींचे धक्कादायक विधान

हार्दिक पांड्यामुळे वर्ल्ड कप हरलो; रवी शास्त्रींचे धक्कादायक विधान

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : अष्टपैलू हार्दिक पांड्यामुळे वर्ल्ड कप हरल्याचे विधान भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेत रवी शास्त्री यांनी कॉमेंट्री बॉक्समधून केले आहे.

दरम्यान रवी शास्त्री टीम इंडियाचे प्रशिक्षक असताना संघाने चांगली कामगिरी केली होती. त्याने माजी कर्णधार विराट कोहलीसोबत कसोटी क्रिकेटमध्ये मोठे यश मिळू दिले. टीम इंडिया रेड बॉल क्रिकेटमध्ये रवी शास्त्री त्याच्या नेतृत्वाखाली एक मजबूत संघ होता. मात्र, शास्त्री यांना आयसीसी स्पर्धा एकदा पण जिंकता आली नाही.

टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटले आहे की, अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे टीम इंडियाला वर्ल्ड कपमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. मला नेहमीच असा खेळाडू हवा होता जो टॉप-६ मध्ये बॅटने आणि गोलंदाजी करू शकेल. हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे ही मोठी समस्या निर्माण झाली होती. आमच्याकडे सहावे गोलंदाजी करायला कोणीच नव्हते. मी निवडकर्त्यांना त्याच्या जागी दुसरा खेळाडू शोधण्यास सांगितले होते.

भारताने २०१९ आयसीसी क्रिकेट विश्वचषकामध्ये रवी शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरी गाठली. त्यानंतर २०२१ मधील आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघ अंतिम फेरी खेळला. रवी शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली शेवटचा टी-२० विश्वचषक भारत खेळला पण साखळी फेरीतच बाद झाला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या