22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeक्रीडा...तुम्हाला संघातून बाहेर करण्यात येते ; व्यंकटेश प्रसाद बीसीसीआयवर संतापले

…तुम्हाला संघातून बाहेर करण्यात येते ; व्यंकटेश प्रसाद बीसीसीआयवर संतापले

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनी बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनावर निशाणा साधला आहे. एक काळ असा होता की जेव्हा तुम्ही फॉर्ममध्ये नसता, तेव्हा तुमची प्रतिष्ठा काय आहे हे जाणून न घेता तुम्हाला संघातून बाहेर करण्यात येते.

सध्या फॉर्मात नसलेल्या खेळाडूंना विश्रांती देण्यात येत असल्याचे व्यंकटेश प्रसाद यांनी म्हटले आहे. सध्या खराब फॉर्मशी झगडणा-या विराट कोहलीवर व्यंकटेश प्रसादांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. एक काळ असा होता जेव्हा तुम्ही आउट ऑफ फॉर्म होता, तुमच्या प्रतिष्ठेची पर्वा न करता तुम्ही बाहेर करण्यात येते.

सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, झहीर खान आणि हरभजन सिंग यांसारखे सर्व खेळाडू फॉर्ममध्ये नसल्यामुळे वगळण्यात आले. यानंतर तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतले, धावा केल्या आणि पुन्हा टीम इंडिया फॉर्मात आली.

असे वाटत आहे की, नियमात काही बदल केले आहेत. जिथे आउट ऑफ फॉर्म होतो तिथे विश्रांती देण्यात येते. हा काय कोणत्या प्रगतीचा रस्ता नाही. देशात इतकी प्रतिभा आहे की तुम्ही तुमच्या प्रतिष्ठेशी खेळू शकत नाही. भारताच्या महान मॅच-विनर्सपैकी एक, अनिल कुंबळे अनेक प्रसंगी बाहेर बसले. काहीतरी मोठे साध्य करण्यासाठी कृती आवश्यक असते. अशा शब्दात व्यंकटेश प्रसाद यांनी बीसीसीआयसह संघ व्यवस्थापनाला खडेबोल सुनावले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या