25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeक्रीडातू चेन्नईला तुडवलंस; सेहवागचे पोलार्डसाठी मजेशीर ट्विट

तू चेन्नईला तुडवलंस; सेहवागचे पोलार्डसाठी मजेशीर ट्विट

एकमत ऑनलाईन

मुंबई : कॅरोन पोलार्डच्या वादळी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जवर ४ विकेट्स राखून थरारक विजय मिळवला. चेन्नईने २१८ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरादाखल पोलार्डने अशक्य वाटणारी धावसंख्या आपल्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर शक्य करून दाखवली. पोलार्डने ३४ चेंडूत नाबाद ८७ धावा ठोकत, चेन्नईचे २१९ धावांचे तगडे आव्हान शेवटच्या चेंडूवर पार केले़ पोलार्डने ६ चौकार आणि ८ षटकार ठोकले. चेन्नईच्या बॉलर्सला त्याने अक्षरश: बॅटने तुडवले. त्याच्या याच धमाकेदार खेळीवर भारताचा दिग्गज माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने मजेशीर ट्विट केले आहे. पॉली काकाने चेन्नईला काय धू धू धुतले , असे ट्विट करत त्याने पोलार्डच्या खेळीचे कौतुक केले आहे.

पोलार्डने चेन्नईच्या गोलंदाजांवर हल्ला चढवून ज्या प्रकारे मुंबईला अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला, तो अफलातून होता. पोलार्डच्या या खेळीनंतर सगळा सोशल मीडिया पोलार्डमय झाला. सोशल मीडियात त्याच्या नावाचा डंका पाहायला मिळाला. शेर चाहे कितना भी बूढा हो जाये, वो घास नहीं खाता असे म्हणत तुल्यबळ विरोधकासमोर पोलार्डच्या जलव्याचे मुंबईचे फॅन्स वर्णन करू लागले.

सेहवाग काय म्हणाला?
वीरेंद्र सेहवागनेही सामना संपल्यानंतर एक मजेशीर ट्विट केले. ट्विटमध्ये सेहवाग म्हणतो, पॉली काका काय खेळलास याऱ़़ तू चेन्नईला तुडवलंस, धू धू धुतले .! आपल्या ट्विटमधून त्याने पोलार्डची तोंडभरून स्तुती केली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात रुग्ण घटल्याने दिलासा; रविवारी ४८६ नवीन रुग्ण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या