23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeक्रीडातुमचा विजय देशासाठी प्रेरणादायी; राष्ट्रकुलमधील विजेत्यांशी पंतप्रधानांचा संवाद

तुमचा विजय देशासाठी प्रेरणादायी; राष्ट्रकुलमधील विजेत्यांशी पंतप्रधानांचा संवाद

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव समारंभाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत यश संपादन केलेल्या खेळाडूंशी संवाद साधला आहे. यावेळी जिंकलेल्या आणि सहभागी झालेल्या सर्वांचे त्यांनी स्वागत केले आहे. भारतीय खेळाडू नव्या नव्या खेळात प्राविण्य मिळवत आहेत असं पंतप्रधान म्हणाले आहेत.

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने तब्बल ६१ पदकं मिळवली आहेत. त्यामध्ये भारताच्या मुलींनी आणि नव्या खेळाडूंनीही चांगले प्रदर्शन केलं आहे. हा तुमचा खेळ देशासाठी प्रेरणादायी आहे असं म्हणत पंतप्रधान मोदींनी त्यांचे स्वागत केले.

भारतीय खेळाडू हे कोणत्याही खेळासाठी तत्पर असतात, दरम्यान ज्या खेळाडूंचे थोडक्यात पदक हुकले त्यांनी भारताची माफी मागण्याची गरज नाहीये. तुम्ही देशासाठी विजेते आहात. फक्त तुम्ही आपला खेळ इमानदारीने खेळा. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय मुलींने रौप्यपदक जिंकले असून तुमचे हे यश भारतातील प्रत्येक मुलीसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास मोदींना दिला आहे.

तुम्ही भारताला फक्त पदके जिंकून दिले नसून भारतीयांच्या मनातल्या भावनांना सदृढ केले आहे. त्याचबरोबर खेळातीलच नाही तर इतर सेक्टरमधील युवकांना प्रेरणा देणारं तुमचं काम आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि भारताला स्वातंर्त्य मिळवून देण्यात हातभार लावला आहे. त्यांची जशी प्रेरणा आपणाला मिळते तशीच प्रेरणा भारतीय युवकांना तुमच्या विजयाने मिळणार आहे. असे गौरवाचे उद्गार मोदींना काढले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या