22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeक्रीडायुवराजच्या मुलाचे नाव ओरियन कीच

युवराजच्या मुलाचे नाव ओरियन कीच

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काल (१९ जून) जगभरात ‘फादर्स डे’साजरा झाला. त्यानिमित्त सामान्य नागरिकांपासून ते अनेक लोकप्रिय सेलिबिटिंनी आपापल्या वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. अनेक सेलिब्रिटिंनी सोशल मीडियावर आपल्या वडिलांसाठी आणि मुलांसाठी भावनिक पोस्ट टाकल्या. भारताचा धडाकेबाज क्रिकेटपटू युवराज सिंगनेदेखील आपल्या मुलासाठी सोशल मीडियावर खास पोस्ट केली. फादर्स डेचे निमित्त साधून त्याने आणि हेझल कीचने आपल्या चिमुकल्याचे नावही जाहीर केले.

युवराज सिंगने ३० नोव्हेंबर २०१६ रोजी अभिनेत्री हेझल कीचशी लग्न केले होते. या वर्षी जानेवारीमध्ये दोघे पहिल्यांदा आई-वडील झाले. आपला मुलगा पाच महिन्यांचा होऊनही अद्याप युवराजने त्याचे नाव जाहीर नव्हते केले. मात्र, आता त्याने मुलाचे नाव उघड केले आहे. युवी आणि हेझलने आपल्या मुलाचे नाव ‘ओरियन कीच सिंह’, असे ठेवले आहे. युवीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली आहे.

युवराज सिंगने दिलेल्या मुलाखतीत मुलाच्या नावाच्या अर्थाचा खुलासा केला आहे. ‘ओरियन हा तारामंडळातील एक तारा आहे आणि प्रत्येक पालकांसाठी त्यांचे मूल हे एक ताराच असते. गरोदर असताना हेझल रुग्णालयात झोपली होती. तेव्हा मी एका सिरीजचे काही भाग बघितले होते. त्यावेळी ओरियन हे नाव माझ्या मनात आले आणि हेझललादेखील ते लगेचच आवडले. शिवाय, हेझलचे आडनावही आमच्या बाळाला मिळावे, अशी माझी इच्छा होती. म्हणून त्याचे नाव ओरियन कीच सिंग ठेवले आहे.’

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या